Himanshi Khurana-Asim Riaz Saam Tv
मनोरंजन बातम्या

Himanshi-Asim Breakup: बिग बॉस फेम आसिम रियाज आणि हिंमाशी खुरानाचा ब्रेकअप, वेगळं होण्याचं कारणही सांगितलं...

Himanshi Khurana-Asim Riaz Breakup: हिमांशी खुरानाने तिच्या ब्रेकअपचा खुलासा केला. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण देखील सांगितले आहे.

Priya More

Himanshi Khurana-Asim Riaz:

'बिग बॉस 13' मधील (Bigg Boss 13) लव्ह बर्ड्स आणि स्टार कपल असीम रियाझ (Asim Riaz) आणि हिमांशी खुराना (Himanshi Khurana) सध्या चर्चेत आले आहे. दोघांच्याही चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे स्टार कपल आता वेगळे झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे कपल वेगळे झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या कपलने कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती.

पण आता या कपलचा ब्रेकअप (Himanshi-Asim Breakup) झाल्याचं कन्फर्म झाले आहे. कारण नुकताच हिमांशी खुरानाने तिच्या ब्रेकअपचा खुलासा केला. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण देखील सांगितले आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेता असीम रियाझ आणि पंजाबी गायिका- अभिनेत्री हिमांशी खुराना यांच्या ब्रेकअपची अधिकृत माहिती समोर आल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. असीम आणि हिमांशीला आसिमांशी असं म्हणून फॅन्स बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघाचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर हिमांशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Himanshi Khurana Post

हिमांशी खुरानाने इन्स्टाग्रामवर ब्रेकअपसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असे लिहिले आहे की, 'होय, आम्ही आता एकत्र नाही आहोत. आम्ही एकत्र घालवलेला वेळ खूप चांगला होता. पण आता आम्ही एकत्र नाही. आमच्या नात्याचा प्रवास छान होता आणि आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जात आहोत. आपापल्या धर्माचा आदर करत असताना, आपल्या वेगवेगळ्या धार्मिक समजुतींमुळे आम्ही आमच्या प्रेमाचा त्याग करत आहोत. आम्ही एकमेकांविरोधात अजिबात नाही. आम्ही तुम्हाला आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती करतो.'

दरम्यान, हिमांशी आणि असीम यांची भेट 'बिग बॉस 13' च्या घरामध्ये झाली होती. या शोदरम्यान दोघांची जवळीक वाढली आणि त्यांनी टीव्हीवर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. हिमांशीने या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. चाहते या कपलला ‘असिमांशी’ म्हणायचे. असीम हिमांशीच्या प्रेमात पडला होता आणि संपूर्ण सीझनमध्ये तिच्यासोबत फ्लर्ट करताना दिसला होता. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतरही हे कपल अनेकदा एकत्र स्पॉट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT