Jhund Movie Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhund: झुंड चित्रपटातील कलाकारावर दागिने चोरल्याचा आरोप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

झुंड चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रियला चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jhund: बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेले आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता.चित्रपटातील सर्व कलाकार नेहमीच चर्चेत असतात. त्यातील एक कलाकार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रियला चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी अटक केली आहे. १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रियला नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रियांशूने ‘झुंड’ चित्रपटात बाबू ही भूमिका साकारली होती.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय प्रदीप मोंडावेंच्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेले होते. याप्रकरणात मोंडावे यांनी पोलीसात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मोंडावे कुटुंबाच्या नागपुरातील सध्या स्थित असलेल्या घरातून हा लाखोंचा ऐवज चोरी झाला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते.

त्याची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा उर्फ बाबूचा सहभाग असल्याचा त्याने खुलासा केला. यानंतर मंगळवारी नागपूर पोलिसांनी प्रियांशू क्षत्रियाला अटक केली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियांशूला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तसेच पुढे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमामध्ये या परिसरातील काही भाग चित्रीत करण्यात आला आहे.

समीक्षकांकडून चित्रपटाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. झुंड चित्रपट विजय बारसे या माजी क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित असून त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी फुटबॉलशी परिचय करुन दिला. त्यांनी तेथील झोपडपट्टीतील मुलांना योग्य शिकवण देत सर्वांचीच वृद्धी केलेली दिसत आहे.

प्रियांशू क्षत्रियला यापूर्वी ही रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन, किशोर कदम, छाया कदम, रिंकु राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे, अंकुश गेदाम, प्रियांशु क्षत्रिय, रजिया काजी सह इतरांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT