मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: आमचं ठरलंय! आमचं कधीच ब्रेकअप झालं नाही, अरबाजसोबतच लग्न करणार, निक्कीसोबतच्या चर्चा लिझाने एका झटक्यात संपवल्या!

Leeza Bindra Instagram Post about Arbaz Patel: बिग बॉस मराठीच्या ५व्या सिझनमध्ये निक्की आणि अरबाजच्या जोडीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांच्यामधील नात्यावर अरबाजच्या गर्लफ्रेंडने पोस्ट केले आहे. पेस्टमध्ये लिझाने तिच्या आणि अरबाजच्या नात्याबद्दल कबुली दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या ५व्या पर्वातील अरबाज आणि निक्कीचं नातं आणि त्यांच्याती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये दोघे अनेकवेळा एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये अरबाजने तो कमिटेड असल्याची कबुली घरातील सदस्यांसमोर आणि जनतेसमोर दिली होती. अरबाज बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड तिच्या सोशल मीडियावर सातत्यांने पोस्ट करत असते. अरबाजच्या गर्लफ्रेंडचे नाव लिझा बिंद्रा आहे. अरबाजबद्द चुकिचे कमेंट्स करू नका असं सांगणाऱ्या लिझाने तिचं आणि अरबाजचं रिलेशनशिप सुरु असल्याची कबुली दिली आहे.

लिझाने तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक पोस्ट केल्या. तिच्या सर्व पोस्टमध्ये ती आपल्याला अरबाजसोबत पाहायला मिळतेय. लिझाने तिचा आणि अरबाजचा एक रोमँटिक फोटो देखील शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देत "मी तुला वचन देते की मी तुझ्यासोबत नेहमी असेन." असे लिहिलं आहे. त्यापोस्टमध्ये लिझाने अरबाजला टॅग देखील केलं होतं.

लिझाने रात्री एक स्टोरी पोस्ट केली होती ज्यामध्ये तिने अरबाज आणि तिचा रोमँटिक फोटो शअर केला आहे. त्या फोटोला "तु कधीच एकटा नाही आहेस. मी नेहमीच तुझ्या सोबत आहे प्रत्येत चांगल्या आणि वाईट काळात. "असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर तिने सांगितले की, "मी अरबाजच्या आईला तिच्या मुलासाठी दुआ मागताना पाहिलं आहे. अरबाज त्याच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिग बॉसच्या शोमध्ये गेला आहे. तो चुकिचा नाही तो जर चुकिचा असता तर त्यने सर्वांसमोर आमच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले नसते. कोणताही शो कोणाचं नातं तोडू शकत नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत आणि त्याच्या प्रत्येक प्रवासात मी त्याच्यासोबत असेन."

लिझाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याचं लिझावर प्रेम आहे आणि दोघे लवकरच लग्न करणार आहेत असं अरबाज म्हणतोय. बिग बॉसच्या सुरुवातीला बिग बॉसमध्ये निक्की आणि अरबाजची जवळीक पाहून नाराजी दाखवणाऱ्या पोस्ट करत होती. परंतु पुम्हा एकदा तिचं अरबाजवर किती प्रेम आहे हे प्रेक्षकांना पटवून देत आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT