Marathi Bigg Boss Saam Tv
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 4: चार स्पर्धकांसाठी स्पर्धा सुरु होण्याआधीच संपणार!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'बिग बॉस मराठी 4' (Big Boss Marathi 4) हा रिऍलिटी शो (Program) 2ऑक्टोबरपासून प्रेक्षांच्या भेटीला आला. पहिल्या दिवसापासूनच घरात वाद सुरु झाले. पाहूया काय सुरु आहे 'बिग बॉस मराठी 4'च्या घरामध्ये. दुसऱ्या एपिसोडची सुरुवात ‘आटली बाटली फुटली’ या नॉमिनेशन टास्कने झाली. ग्रँड प्रीमियरच्या दिवशी इतर घरातील सदस्यांनी मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रोहित शिंदे आणि प्रसाद जवादे यांना नॉमिनेट केले होते. नॉमिनेट झालेल्या या चार स्पर्धकांना संधी देत बिग बॉसने ‘आटली बाटली फुटली’ टास्कची सुरूवात केली.

बिग बॉसने या चार स्पर्धकांना त्यांना वगळून कोणत्याही स्पर्धकाला नॉमिनेट करण्यास सांगितले. 'आटली बाटली फुटली' या टास्कला न्याय देण्यासाठी पहिल्या दिवशी नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांना घरातील इतर स्पर्धकांच्या डोक्यावर काचेची बाटली फोडून नॉमिनेट करायचे होते.

त्रिशूल मराठे, मेघा घाडगे, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे यांनी यशश्री मसूरकर, विकास सावंत, अमृता देशमुख, निखिल राजेशिर्के, तेजस्विनी लोणारी आणि योगेश जाधव यांच्या डोक्यात काचेच्या बाटल्या फोडून त्यांना नॉमिनेट केले.

अमृता देशमुख, निखिल राजेशिर्के यांनी नॉमिनेशन अनफेअर असल्याचे सांगितले. त्यांना ज्या स्पर्धकांनी नॉमिनेट केले आहे त्यांनी योग्य कारण सांगितले नाही आणि त्यांचे नॉमिनेशन अन्यायकारक आहे, असे त्यांचे म्हणणे होते. बिग बॉसने नंतर यशश्री मसुरकर, विकास सावंत, अमृता देशमुख, निखिल राजेशिर्के, तेजस्विनी लोणारी आणि योगेश जाधव यांना घर बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले स्पर्धक म्हणून घोषित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IIT Bombay Job : IIT बॉम्बेमध्ये नोकरी; १,४२,००० रुपये पगार; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: पुण्यात पंजाब नॅशनल बँकेच्या महीला व्यवस्थापकाने बँकेच्या लॉकर मधून चोरले पाऊने तीन कोटी रुपयांचे सोने

WTC Points Table: WTC च्या गुणतालिकेत मोठा फेरबदल! ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, तर टीम इंडियाची चांदी

Buldhana News: बुलडाण्याच्या सुपुत्राला वीरमरण, दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद

Alu Leaves: आळूच्या पानांचे आरोग्याला होतील जबरदस्त फायदे...

SCROLL FOR NEXT