Dhanush- Aishwarya
Dhanush- Aishwarya Saam Tv

घटस्फोटाची घोषणा करणाऱ्या जोडीचा युटर्न; धनुष- ऐश्वर्याचे 'जुळुन येणार रेशीमगाठ'

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि थलैवास्टार रजनीकांतची लेक ऐश्वर्याने वैवाहिक जीवनातून घटस्फोट घेण्याचा निर्णयाने तिच्या परिवारासोबत चाहत्यांमध्येही निराशा दिसत होती.
Published on

मुंबई: सध्या चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज जोड्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. कोणाच्या घटस्फोटाची चर्चा रंगते तर काहींचा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे. काहींनी आपल्या लग्नाच्या दोन ते तीन वर्षानंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला तर काहींनी एकत्र दशक घालवत घटस्फोटाचे पाऊल उचलले. यात किरण- आमिर सोबतच काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतलेली जोडी धनुष- ऐश्वर्याने वेगळे राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण आता धनुष आणि ऐश्वर्या पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे.

Dhanush- Aishwarya
Madhuri Dixit: माधुरी दिक्षितचे 'सीफेसिंग' नवे घर; किंमत वाचून व्हाल अवाक

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि थलैवास्टार रजनीकांतची लेक ऐश्वर्याने वैवाहिक जीवनातून घटस्फोट घेण्याचा निर्णयाने तिच्या परिवारासोबत चाहत्यांमध्येही निराशा दिसत होती. दरम्यान याबद्दल एक महत्वाची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनीही आपला निर्णय बदलला आहे. जानेवारीत दोघांनीही घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकमेकांना संधी देऊ इच्छित आहे.

Dhanush- Aishwarya
तेजस्विनी पंडित पुन्हा नव्या वेबसीरिज येतेय; पोस्ट बघताच काहीतरी भन्नाट असणार हे नक्की!

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्या राहत्या घरी दोन्ही कुटुंबाची बैठक पार पडली. त्यावेळी रजनीकांत आपल्या लेकीचा संसार वाचवण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करणार असल्याचे कळत आहे. धनुष आणि ऐश्वर्याने १८ वर्ष एकत्र मुलांचे आई-बाबा, मित्र- मैत्रिण आणि पती- पत्नी म्हणून घालवले होते. पण नंतर त्यांनी २०२२ यावर्षाच्या सुरुवातीला विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांना स्वत:ला समजून घेण्यासाठी वेळ काढत एकांतात जगायचे होते.

Dhanush- Aishwarya
Boycott Adipurush: ट्विटरवर सर्वाधिक 'आदिपुरुष' बॉयकॉट ट्रेंडमध्ये

धनुष- ऐश्वर्याची लव्हस्टोरी

या दोघांचीही एका कार्यक्रमात भेट झाली होती. धनुष 'काढाल कोंडे' चित्रपट पाहायला गेला त्यावेळी ऐश्वर्या आणि तिची बहिण सौंदर्यशी भेट झाली होती. तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. तेव्हा पासूनच त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगत होती. त्यांच्या कुटुंबियांनी दोघांनाही लग्नाचा सल्ला दिला होता. २००४ साली लग्नबंधनात अडकले होते. त्यावेळी धनुष २१ तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com