Abhijit Bichukale News  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abhijeet Bichukale : शाहरुख खानचा पठाण सिनेमातील लूक माझ्यासारखाच; अभिजीत बिचुकलेचा मोठा दावा

बिगबॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकले पुन्हा एका त्याच्या विधानामुळे चर्चेत आला आहे. या

साम टिव्ही ब्युरो

Abhijeet Bichukale News : बिगबॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकले पुन्हा एका त्याच्या विधानामुळे चर्चेत आला आहे. यावेळी थेट बिचुकलेने पठाण सिनेमातील शाहरूखचा लूक माझ्यासारखा असल्याचा दावा केला आहे. अभिजीत बिचुकलेने साताऱ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना दावा केला आहे. (Latest Marathi News)

अभिजीत बिचुकले म्हणाला, 'शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. ही गोष्ट सकारात्मक म्हटली पाहिजे. माझी बिगबॉसमध्ये अशीच हेअरस्टाईल होती. १९९१ साली मी लहान होतो, तेव्हा संजूबाबा म्हणजे संजय दत्तचे केस लांब होते. मात्र, आता २२ वर्षांनी जी आणलेली स्टाईल माझी आहे'.

अभिजीत बिचुकले पुढे म्हणाला, 'मला वाटतं शाहरुख खानने (Shah Rukh Khan) बिग बॉस बघत असावा. त्याने बिगबॉसचा सिझन नंबर १५ मध्ये 'मैने क्या गुल खिलाए' हे शाहरुखने पाहिलं आहे. लोकांनी देखील पाहिलं आहे. त्यामुळे लांब केसाची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी'.

शाहरुखचा लूक माझ्यासारखा - बिचुकले

बिचुकले पुढे म्हणाला, 'शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखाच आहे. माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल तशीच होती. मला वाटतं की, शाहरुखही बिग बॉस बघत होता. त्यामुळे माझी लांब केसाची स्टाईल ट्रेंडमध्ये आली असावी'.

अभिजीत बिचुकले पुढे म्हणाला,'सलमान खान आणि मी एका सिनेसृष्टीत आहे. सिनेसृष्टी असेल किंवा राजकारण असेल इथं कोणचा शत्रू असतो असं मला वाटत नाही. त्यावेळी ते घडून गेलेलं असतं. आज, सलमान खानचा वाढदिवस आहे. ते दरवर्षीसारखा साजरा करत आहे. त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे माणूस म्हणून त्याला शुभेच्छा आहेच, असंही अभिजीत बिचुकलेने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT