Amitabh Bachchan Big Budget Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: बिग बींचे चित्रपटही असतात बिग बजेट, तरीही निर्मात्यांची पहिली पसंदी अमिताभ यांनाच

अमिताभ बच्चन बॉलिवूडच्या बहुतांश बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amitabh Bachchan Upcoming Movies: बिग बी अमिताभ बच्चन वयाच्या ८०व्या वर्षीही काम करत आहेत. सेलिब्रिटींना या वयात काम मिळणे अवघड होते किंवा अभिनय क्षेत्रापासून लांब राहणेच पसंत करतात. पण अमिताभ बच्चन अजूनही चित्रपटांमध्ये काम करत आहेत. या वयातही त्यांच्याकडे कामाची कमतरता नाही. इंडस्ट्रीमध्ये बिग बी अमिताभ बच्चन कामाप्रती त्यांच्या असलेल्या निष्ठेसाठी ओळखले जातात.

कोणत्याही कलाकारासाठी बॉलिवूडमध्ये आपले स्थान मिळवणे सोपे नाही. या वयातही अमिताभ बॉलिवूडच्या बहुतांश बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसतात. जिथे नवीन कलाकार आणि तरुण स्टार्सकडे आज काम नसले तरी अमिताभचे यांचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही बिग बींचे 5 चित्रपट प्रलंबित आहेत जे प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. (Amitabh Bachchan)

आजही निर्माते अमिताभ बच्चन यांच्यावर ८०० कोटींचा दावा करायला घाबरत नाहीत. अमिताभ यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, आजही त्यांचे 'गणपत', 'घूमर', द उमेश क्रॉनिकल्स, 'प्रोजेक्ट-के' आणि 'बटरफ्लाय' हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. एवढेच नाही तर या चित्रपटांव्यतिरिक्त, निर्माते त्यांच्या उर्वरित चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांना घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. (Movie)

अमिताभ याचे लक्ष मोठ्या पडद्यावर असले तर ते टीव्हीवर त्यांच्या क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती का 14' मध्ये देखील दिसत असतात. त्यांचा हा शो टीव्हीवरील आवडत्या शोपैकी एक आहे. त्याच्या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. वयाच्या या टप्प्यावर येऊनही अमिताभ बच्चन 15-15 तास काम करतात जेणेकरून त्यांना त्यांच्या प्रत्येक कामाला पूर्ण वेळ देता येईल. (TV)

अमिताभ यांच्या आगामी चित्रपटांच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर टायगर श्रॉफ स्टारर 'गणपत' चित्रपटाचे बजेट 200 कोटी रुपये आहे. याशिवाय बिग बी 'घूमर' चित्रपटात कॅमिओ करणार आहेत. बिग बींच्या या चित्रपटाचे बजेट 35 कोटी रुपये आहे. याशिवाय 'प्रोजेक्ट-के' आणि 'बटरफ्लाय'चे बजेट यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT