Amitabh & Abhishek Visit Siddhivinayak Temple: सध्या बॉलिवूडचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसत आहेत. अनेक दिग्गज कलाकार असलेले बिग बजेट चित्रपट देखील फ्लॉप ठरले आहेत. यातच बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'उंचाई' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी शुक्रवारी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे.
अमिताभ आणि अभिषेक यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये पिता-पुत्र सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दर्शन घेताना दिसत आहेत. अमिताभ आणि अभिषेक त्यांनी मंदिरात जाताना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तसेच दोघेही ‘प्रसाद’ स्वीकारताना सुद्धा दिसत आहेत. (Viral Video)
काही दिवसांपूर्वी झालेल्या 'उंचाई' चित्रपटाच्या प्रीमियरला बिग बी कुठेही दिसले नव्हते. अभिषेक आणि जया बच्चन यांनी चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावून त्यांची बाजू सावरली होती. (Movie)
'उंचाई' चित्रपटामध्ये अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा, नीना गुप्ता आणि सारिका या कलाकारांचा देखील समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचा 'गुडबाय', 'झुंड', 'चेहरे' आणि 'रनवे 34' या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आली नव्हती. म्हणूनच बिग बी अमिताभ यांनी 'उंचाई' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे. (Amitabh Bachchan)
'उंचाई' चित्रपटामध्ये काही वयोवृद्ध मित्र त्यांच्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्याचे साहस करतात. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी एका वेबसाईटवर या चित्रपटविषयी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "करिअरमध्ये पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसच्या आकड्यांबाबत मी बेफिकीर आहे. मला असे वाटले की मला एक चित्रपट बनवायचा आहे जिथे मला किती डान्सर्स, गाणी, पहिल्या दिवसाचे कलेक्शन काय असेल याची काळजी नसेल. कारण मी आयुष्यभर स्पर्धा करत आलो आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.