Marathi Upcoming Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Upcoming Movie: वडील अन् मुलींच्या नात्यांचा भावनिक प्रवास, ‘तू माझा किनारा’ ट्रेलर प्रदर्शित

Tu Maza Kinara Movie Trailer Launch: ‘तू माझा किनारा’ या कौटुंबिक आणि भावनिक मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भूषण प्रधान आणि केतकी नारायण यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा नात्यांच्या उबदार प्रवासाची कहाणी सांगतो.

Manasvi Choudhary

काही कथा नुसत्या सांगायच्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात. शब्दांपलीकडे जाऊन, भावनांच्या भाषेत उलगडणारी अशीच एक कथा ‘तू माझा किनारा’ आज आपल्या समोर येत आहे. एका घरातल्या, एका कुटुंबातल्या नात्यांचा हा प्रवास वडील, आई आणि मुलगी यांच्या नात्यातून कुटुंबाच्या एकत्रतेचा आणि प्रेमाच्या गाभ्याचा शोध घेणारा आहे.

आज या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात उब आणि भावनिक ओलावा निर्माण केला आहे. ट्रेलरच्या पहिल्याच क्षणापासून घरातील नात्यांची नाजूक गुंफण जाणवते. खोल भावविश्वांमधून वाहणारी ही कथा केवळ एका नात्याची नाही, तर प्रत्येक कुटुंबाच्या हृदयाशी जोडणारी आहे.

भूषण प्रधान एका संवेदनशील, अंतर्मुख वडिलांच्या भूमिकेत तर केतकी नारायण एका समजूतदार आणि भावनिक आईच्या रूपात दिसते. या दोघांच्या अभिनयाला लहानग्या केया इंगळेचा निखळ निरागसपणा सुंदर परिपूर्णता देतो. सोबतच⁸ प्रणव रावराणे भूषण प्रधानांच्या मित्राच्या भूमिकेत तर अरुण नलावडे वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सर्व कलाकारांच्या सहज आणि प्रभावी अभिनयाने ट्रेलरला वास्तवाची आणि ऊबदार भावनांची छटा मिळाली आहे.

ट्रेलरमधील दृश्यांमध्ये वास्तव जीवनाची छाया आहे. घरातील लहानसं जग, दैनंदिन क्षणांतील प्रेम आणि अव्यक्त वेदना. संवाद, संगीत आणि छायांकन या तिन्ही घटकांनी या कथेचा आत्मा अधिक जिवंत केला आहे. ‘तू माझा किनारा’ हा केवळ एका बापलेकिच्या नात्याचा प्रवास नाही, तर प्रत्येक कुटुंबाला स्वतःच्या आयुष्याचा आरसा दाखवणारा भावनिक अनुभव आहे.

या चित्रपटाची निर्मिती जॉइसी पॉल जॉय यांनी केली असून, सह-निर्माते सिबी जोसेफ आणि जॅकब जेव्हियर आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांचे असून, त्यांनी कुटुंबातील नात्यांच्या गुंतागुंतीला हळुवारपणे उलगडलं आहे. रूपांतरित पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन एल्धो आयझॅक, संकलन सुबोध नारकर, आणि कला दिग्दर्शन अनिल केदार यांनी साकारले असून, त्यांच्या कार्यामुळे चित्रपटाला वास्तवाचा आणि संवेदनांचा सुंदर मेळ लाभला आहे.

३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणारा ‘तू माझा किनारा’ हा सिनेमा प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या घरातील, आपल्या माणसांतील नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहायला लावेल. कारण शेवटी, प्रत्येकाचं आयुष्य कुणाच्यातरी किनाऱ्याशी जोडलेलं असतंच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT