Shruti Vilas Kadam
करिना कपूर खानने घातलेला राहुल मिश्रा डिझाइन केलेला विंटेज ब्लॅक गाउन तिच्या रॉयल लुकला एक वेगळाच आयाम देतो. हा गाउन इतका मोहक आहे की तो पाहून नजर हटत नाही.
गाउनमध्ये नेट फुल स्लीव्ह्ज आणि स्वीटहार्ट आकाराची नेकलाइन दिली आहे. त्यामुळे करिनाच्या व्यक्तिमत्त्वात एकाच वेळी सौंदर्य, नजाकत आणि आत्मविश्वास दिसून येतो.
या गाउनचा सिल्हूट आणि आर्किटेक्चरल फिनिश तिच्या देहबोलीला एक भव्य आणि रेखीव लुक देतो. तिच्या चालण्यातून एक क्लासिक चार्म जाणवतो.
करिनाने आपल्या गाउनला केंद्रस्थानी ठेवत अत्यंत साध्या अॅक्सेसरीजचा वापर केला आहे. फक्त एक आकर्षक झुमका आणि सूक्ष्म मेकअप यामुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्याला उठाव मिळतो.
करिनाने आपला मेकअप आणि हेअरस्टाइल ओल्ड हॉलीवूड ग्लॅम स्टाईलमध्ये केला आहे. सौम्य कर्ल्स आणि न्यूड टोन मेकअपने तिचा हा संध्याकाळी लुक आणखी उठावदार बनवला आहे.
या संपूर्ण लुकच्या मागे रिया कपूरचा स्टाइलिंगचा मास्टरस्ट्रोक आहे. तिने करिनाच्या नैसर्गिक एलिगन्सला अधोरेखित करत गाउनला केंद्रबिंदू ठेवलं.
हा गाउन फॅशनमधील एक आर्टफॉर्म आहे. “Fashion look like art” या शीर्षकाला साजेशी करिनाची ही झलक फॅशनप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.