Bhool Bhulaiya 3 
मनोरंजन बातम्या

Bhool Bhulaiya 3: भूल भुलैया 3' अक्षय कुमारचीही एंट्री? दुसऱ्या क्लायमॅक्समध्ये येणार डबल मज्जा

Bhool Bulaiyaa 3 Duble Cimax : 'भूल भुलैया 3' चित्रपट एक सर्वांना धक्का देणारी बाब समोर आलीय. या चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स शूट करण्यात आलेत.

Bharat Jadhav

भूल भुलैया 3' च्या ट्रेलरनं सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. हा चित्रपट या वर्षातील सगळ्यात जास्त चर्चेत असलेला चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. आतापर्यंतचा सगळ्यात जास्त पाहिलेला हा ट्रेलर आहे. 'भूल भुलैया 3' ला घेऊन सगळ्यात जास्त उत्साह वाढलाय. त्याचदरम्यान चित्रपटाविषयी मजेशीर गोष्टी समोर आलीय. चित्रपटाच्या कास्टला क्लायमॅक्स काय असणार आहे हे माहितच नव्हतं.

दिग्दर्शक अनीस बज्नीनं चित्रपटासाठी दोन वेगळे क्लायमॅक्स शूट केलेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी खुलासा केलाय.

एका मुलाखतीत बोलतांना अनीस बज्नी यांनी सांगितलं की प्रेक्षकांना मोठा आर्श्चयाचा धक्का बसणार आहे. ते विचार करतील की बापरे हे काय! आम्ही एक चांगला आणि सुंदर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी, आम्ही दोन वेगळे क्लायमॅक्स शूट केले आणि प्रोडक्शन टीमच्या लोकांनी देखील माहित नाही की क्लायमॅक्स कोणता असणार.

'भूल भुलैया 3' च्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन रुह बाबाच्या रुपात दिसत आहे. तर विद्या बालन मंजुलिकाच्या भूमिकेत आहे. तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा आणि राजपाल यादवसोबत अनेक सेलिब्रिटी या चित्रपटात आहेत. अनीस बज्मी यांनी पुढे सांगितलं की 'कास्टनं फक्त प्री-क्लायमॅक्सपर्यंतचा चित्रपट पाहिलाय. त्यांनी सांगितलं की, फक्त मी आणि टीमच्या दुसऱ्या तीन मेंबर्सनं चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिला आहे.

आम्ही दोन क्लायमॅक्स शूट केलेत आणि टीमला हे देखील माहित नाही की असं का करण्यात आलं. सुरुवातीला आम्ही शेवटचा क्लायमॅक्स शूट केला पण तो पाहून मज्जा आली नाही, त्यामुळे मी पुन्हा तो क्लायमॅक्स शूट केलाय. हा शेवटचा क्लायमॅक्स असेल हे ठरलं परंतु सगळं फक्त क्लायमॅक्सला त्यांच्यापासून सीक्रेट ठेवण्यासाठी होतं.

अनीस बज्मी यांनी स्क्रिप्टच्या शेवटचे १५ पेज कलाकारांना दिलेच नाही, कारण प्रेक्षक आणि कलाकार दोघांसाठी हे रहस्य ठेवायचं होतं. दोन्ही क्लायमॅक्स शूट करताना फक्त क्रूच्या एका छोट्या ग्रुपलाच फक्त सेटवर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. अनीस बज्मीनं सांगितलं की 'भूल भुलैया' चं भविष्य हे सरप्राइजनं असणार आहे. अक्षय कुमारला या फ्रेंचायझीमध्ये घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

बज्मी यांनी सांगितलं की, एक चांगली स्टोरी असायला हवी, जी अक्षयला चित्रपटात येण्यासाठी भाग पाडेल. यामुळे अक्षय कुमारचा 'भूल भुलैया 3' मध्ये कॅमियो असू शकतो. अनीस बज्मी यांनी सांगितंल की 'भूल भुलैया 3' चे दोन क्लायमॅक्स आहेत, तर असं असू शकतं की त्यात अक्षय कुमार असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT