Famous Actress  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

Famous Actress Father Death : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडीलांचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती चाहत्यांना दिली.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

अभिनेत्रीच्या वडीलांचे निधन

अभिनेत्रीने केली भावुक पोस्ट

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीतील अभिनेत्री काजल राघवानीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच तिच्या वडिलांचे निधन झाले. तिने वडिलांचे निधनाची बातमी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून दिली आहे. काजल राघवानीने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

काजल राघवानीची पोस्ट

"बाबा

तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्याचे असह्य नुकसान झाले आहे. तुम्ही दिलेले संस्कार आणि तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील. ईश्वर तुमच्या पुण्यवान आत्म्यास त्यांच्या चरणी स्थान देवो...

भावपूर्ण श्रद्धांजली!"

काजल राघवानीच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजताच तिच्या चाहत्यांनी आणि भोजपुरी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी अभिनेत्रीच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आणि शोक व्यक्त केला. तसेच चाहते पोस्टवर कमेंट करत अभिनेत्रीला धीर देताना दिसत आहेत. या कठीण काळात चाहते आणि मनोरंजन विश्व अभिनेत्रीसोबत आहे.

काजल राघवानी कोण?

काजल राघवानी हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांमध्ये आपल्या अभिनयाने चारचाँद लावले आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्राम 5.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. काजल लवकरच 'भोजपुरी बावल' या रिॲलिटी शोमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT