Akshara Singh Leak MMS Saam TV
मनोरंजन बातम्या

Akshara Singh MMS: मी स्वतःला संपवावे का?, लीक 'एमएमएस'वर अक्षरा सिंहची प्रतिक्रिया

Bhojpuri actress Akshara Singh: अक्षरा सिंह सध्या यूपीच्या बस्त्यांमध्ये शूटिंग करत आहे.

Pooja Dange

Bhojpuri actress Akshara Singh MMS Leak: भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा एमएमएस व्हायरल होत असल्याची सध्या चर्चा आहे. अभिनेत्रीचा आक्षेपार्ह व्हिडिओ टेलिग्राम आणि रेडीडसारख्य साईटवर फिरत असल्याचे बोलले जात आहे. ही बातमी अक्षराला समजताच तिने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षरा सिंह सध्या यूपीच्या बस्त्यांमध्ये शूटिंग करत आहे. तेव्हा तिने तिच्या लीक एमएमएसची अफवा ऐकली. त्यानंतर ती खूप निराश झाली. त्यावर अक्षरा म्हणाली, जेव्हा अशा कोणतेही तथ्य नसलेल्या बातम्या जेव्हा पसरतात तेव्हा त्याचा परिणाम कलाकारांना भोगावा लागतो.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षरा सिंहने सांगितले की, 'मी अजूनही बस्ती आहे आणि इथे स्त्रियांवर आधारित एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे. आताच बातमी वाचली. मी या सगळ्याने खूप वैतागली आहे. मी लब्धच म्हणेन, आता हे बंद करा. लोक काम करण्यासाठी मेहनत करत असतात, त्यामुळे अशा बातम्यांनी त्रास होतो.

माझं स्ट्रगल करिअरच्या सुरुवातीपासून सुरूच आहे. आधी जेव्हा अशा बातम्या यायच्या तेव्हा मी विचार करायचे जाऊ दे यार, कोण या कोर्ट-कचेरीमध्ये अडकेल. परंतु मी क्षणात बसले याचा लोकांनी फायदा घेतला. एकादी गोष्ट सहन करायची पण मर्यादा असते, अजून किती सहन करत राहायचं.'

अक्षरा सिंह पुढे म्हणाली, 'युट्युबवाल्या कोणी असे केले असते तर मला फरक पडला नसत. मला माहित आहे की ते पैसे कामविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मला प्रॉब्लेम मोठे चॅनल आणि मीडियाचा आहे. त्यांना अशा चुकीच्या बातम्या पसरवण्याचा अधिकार कोणी दिला. बातम्या मागील सत्य जाणून न घेता ते छापतात, तेव्हा खूप वाईट वाटत.

मी अद्याप काही सांगितले नाही, मग एका मुलीविषयी अशा बातम्या तुम्ही कशा लिहिल्या? तुम्हाला हा हक्क कोणी दिला? मला हे कळते की. कलाकार या नात्याने मला पत्रकार आणि मीडियाचा आदर केली पाहिजे. परंतु जर ते लोक तुमच्या इज्जतीचा चिंध्या करत असतील तर तो कलाकार तरी काय करेल. माझा हाच सवाल आहे? आता मी त्या मीडिया हाऊसच्या विरोधात कारवाई करणार, पाणी डोक्यावरून गेले आहे.'

अक्षरा म्हणते, 'आधीच एक टोळी 2018 पासून माझ्या मागे लागली आहे. इथे काम करू देत नाही. मी दुसरी आकांक्षा दुबे व्हावे अशी त्यांची इच्छा आहे का? या सगळ्या गोष्टींना कंटाळून मी स्वतःला फाशी द्यावी का? मग कदाचित त्यांना दिलासा मिळेल. लोकांना हेच हवे आहे हे मला चांगले माहीत आहे, पण मी त्यांची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. 2018 पासून, चित्रपट, गाणी यामधील माझ्या व्यावसायिक कामात मला दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मी अजूनही तुटले नाही, मी ठरवले आहे की काहीही झाले तरी मला खंबीर राहायचे आहे. मी संकटात आहे मात्र, अक्षराने कमकुवत होऊ नये, हे मी स्वतःला पटवून देत असते. पुढे जात राहिले पाहिजे, जेणेकरुन जे माझ्याकडे प्रेरणा म्हणून पाहतात त्यांच्यासाठी मी एक उदाहरण बानू शकेन. मला माहित आहे की इंडस्ट्रीतील लोक कसे एक गट तयार करून एका अभिनेत्रीला त्रास देतात, तिचा छळ करतात, तिला कामासाठी संघर्ष करायला लावतात. हे सहन करून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :आंबेगावमधून दिलीप वळसेपाटील पिछाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT