Thumkeshwari Song Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Thumkeshwari: परमसुंदरी 'ठुमकेश्वरी' डान्स फ्लोरवर घालणार धुमाकूळ, VIDEO पाहून ठेका धरणार

'भेडिया' चित्रपटातील 'ठुमकेश्वरी' गाणे प्रदर्शित झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thumkeshwari Bhediya New Song Out: अभिनेत्री क्रिती सेनॉन निर्माता दिनेश विजन यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. त्यांच्या बहुतेक चित्रपटात क्रितीचा करिश्मा पाह्यला मिळाला आहे. क्रिती पुन्हा एकदा दिनेश यांच्या आगामी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भुमीकेत दिसणार आहे.

चित्रपटातील नायिकेवर एक दमदार गाणे चित्रित करण्यावर निर्माते नेहमीच भर देतात. पुढील महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या 'भेडिया' चित्रपटातील 'ठुमकेश्वरी' गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे एक आयटम सॉंग असून या गाण्यात क्रिती सेनॉन पूर्णपणे देसी स्टाईलमध्ये दिसत आहे. तर क्रिती 'आदिपुरुष' या तिच्या आगामी चित्रपटात सीताच्या भूमिकेत दिसणार आहे.

'ठुमकेश्वरी' या गाण्यावरील डान्स गणेश आचार्य त्यांच्या शैलीत कोरिओग्राफ केला आहे. 'केसरिया'चे गीतकार अमिताभ भट्टाचार्य या गाण्यातून त्यांची नवीन ओळख दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. वरुण धवनने या गाण्याविषयी सांगताना म्हटले आहे की, “ठुमकेश्वरी गाणे डान्स फ्लोअर पेटवण्यासाठी तयार केला आहे. मला या फंकी ट्यूनवर परफॉर्म करताना खूप आनंद झाला. या गाण्याचे बोल अतिशय आकर्षक आहेत आणि मला खात्री आहे की चाहते या गाण्यावर नृत्याचा आनंद घेतील." (Bollywood)

या गाण्यात क्रिती सेनॉन वेगवेगळ्या रंगाच्या बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. क्रिती या गाण्यात तिचा चार्म पसरवत आहे. क्रिती म्हणते, “ठुमकेश्वरीच्या शूटिंगमध्ये मला खूप मजा आली. मी वरुणसोबत खूप दिवसांनी स्क्रीन शेअर करत आहे आणि इतक्या भव्य आणि आलिशान ट्रॅकवर आम्ही एकत्र काम केले नाही. हा खूप अविस्मरणीय अनुभव होता". तसेच या गाण्यात 'स्त्री'ची नायिका श्रद्धा कपूर देखील आहे. लाल रंगाच्या पोशाखात श्रद्धा तिच्या खास शैलीत दिसत आहे. श्रद्धाला पाहून लोक 'भेडिया' आणि 'स्त्री' चित्रपटाच्या कथानकात साम्य असल्याच्या चर्चा करू लागले आहेत. (Movie)

सचिन-जिगर यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. तसेच हे गाणे अॅश किंग आणि रश्मीत कौर यांनी गायले आहे. 'भेडिया' चित्रपटात वरुण धवन आणि क्रिती सेनॉन यांच्याशिवाय दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 25 नोव्हेंबर 2022 रोजी हिंदी व्यतिरिक्त तेलुगू आणि तामिळमध्ये 2D आणि 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT