Bigg Boss Marathi 4: कॅप्टन्सी कार्यासाठी 'या' चौघांमध्ये 'चुरशीची लढत', कोण होणार कॅप्टन याची सर्वांनाच उत्सुकता

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला आहे. त्यादरम्यान चांगलाच राडा झाला आहे. घरात आज सर्वांना एक ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे.
Bigg Boss Latest Update
Bigg Boss Latest UpdateSaam Tv
Published On

Bigg Boss Marathi 4: नुकत्याच बिग बॉसच्या स्पर्धकांनी चांगलीच दणक्यात दिवाळी साजरी केली आहे. गाण्याची मैफल, फराळाची मेजवानी, दिवाळीची लगबग आणि इ गोष्टींनी बिग बॉसचे घर आणि त्यातील स्पर्धक चर्चेत आहे. दिवसेंदिवस घरात वाद होत असल्याने सर्वच खेळाडूंवर बिग बॉसने चांगलेच टिकास्त्र सोडले.

घरातील वातावरण प्रत्येक काळाप्रमाणे बदल होत असतात. गेल्या २० दिवसांहून अधिक काळ बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकत्र जरी राहत असले तरी त्यांच्यात वादही होतो आणि चांगलीही मैत्रीही दिसून येते.

Bigg Boss Latest Update
Bollywood Celebrity Troll: बॉलिवूड कलाकार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहूया 'का' झाले ट्रोल

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला आहे. त्यादरम्यान चांगलाच राडा झाला आहे. घरात आज सर्वांना एक ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे, त्यामुळे आजचा दिवसात बिग बॉसचे घर पुन्हा एकदा वाजणार आहे. सर्वच स्पर्धकांना एकमेकांसोबत बोलण्यासाठी हा टास्क दिला होता.

या टास्कमध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची मनधरणी करण्याचा हा टास्क होता. बिग बॉसच्या घरात सर्वांनीच कॅप्टन्सीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. आजच्या भागात कॅप्टन्सीचे हे कार्य रंगताना दिसणार आहे. कोणत्या दोन सदस्यांना ही संधी मिळेल हे आपल्याला आजच्या भागात कळणार आहे.

Bigg Boss Latest Update
Amruta Subhash: ४३ वर्षीय अमृता सुभाषनं प्रेग्नन्सी टेस्ट किटचा फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज', पण...

कॅप्टन्सी पदाचे एकूण चार उमेदवार आहेत ते म्हणजे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत आणि अमृता देशमुख. या चार स्पर्धकांमध्ये 'काटे की टक्कर' होणार हे नक्की. या आठवड्यातील सर्वात सोपा टास्क बिग बॉसने दिल्याने जरा आनंदाचे वातावरण दिसणार आहे.

कॅप्टनरुम मध्ये या चौघांपैकी कोणता पहिला स्पर्धक जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये हे चारही स्पर्धक बिग बॉसने टास्क सांगताच कॅप्टन रुमकडे धाव घेतली. सर्वात आधी त्या घराकडे धाव अक्षयने घेतली.

परंतु मागच्या बाजूने जाणाऱ्या अपूर्वाचा दार उघडताच पाय सरकला तर विकास दारातच खाली पडाला. या धावपळीत अक्षयची काही चूक आहे का हे आजच्या भागात कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com