Amruta Subhas Good News
Amruta Subhas Good NewsSaam Tv

Amruta Subhash: ४३ वर्षीय अमृता सुभाषनं प्रेग्नन्सी टेस्ट किटचा फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज', पण...

अमृता ही आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. काही वेळातच सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला.
Published on

मुंबई : अभिनेत्री अमृता सुभाष हिनं सोशल मीडियावर प्रेग्नन्सी टेस्ट किटचा फोटो शेअर करत गुड न्यूज दिली. त्यामुळं अमृता ही आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. काही वेळातच सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. इतकंच काय तर, चाहत्यांसह मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. यानंतर काही वेळातच तिनं व्हिडिओ पोस्ट करून, तसेच स्वतःच्या पोस्टवर रिप्लाय देत नेमका काय प्रकार आहे हे स्पष्ट करून टाकलं.

अमृता सुभाष ही एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. अमृताने तिच्या कामाने सगळ्यांना नेहमीच प्रभावित केले आहे. तिचे चित्रपट, वेबसीरीज, नाटक या सर्व कलाकृतींचे विषय आशयघन असतात. त्यातून नेहमीच काहीतरी सामाजिक संदेश प्रेक्षकांना मिळत असतो. अमृता सध्या एक पोस्टमुळे चर्चेत आहे. जाणून घेऊया काय आहे ती पोस्ट.

Amruta Subhas Good News
Aditi Rao Hydari: राजघराण्यातील 'या' अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी

अमृताने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पोस्ट मागचे तिचे कारण सुद्धा तितकेच खास आहे. तिच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी तिने या पोस्टद्वारे दिली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Social Media)

ती आई होणार आहे की नाही यावर अमृता सुभाषने खुलासा केला आहे. तिने त्या पोस्टमध्येच म्हटले आहे की, 'मी नाही जया गरोदर आहे. तिच्यावरही असाच प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव करा'. आता अनेकांना हा प्रश्न पडला आहे की ही 'जया' आहे तरी कोण? (Movie)

जया हे अमृताच्या आगामी चित्रपटातील नायिकेचं नाव आहे. हे पात्र स्वतः अमृता साकारत आहे. त्याचाही एक व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका ग्रामीण भागातील स्त्रीच्या भूमिकेत दिसत आहे. 'जया तिला बाळ होईल का? तिचे रिपोर्ट्स काय आले आहेत? 'असे डॉक्टरांना विचारताना दिसत आहे. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो तिच्या आगामी चित्रपटाच्या संदर्भात आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव 'वंडर वूमन' असे आहे. तिच्या इतर कलाकृतींप्रमाणे हा चित्रपट एक वेगळा आशय आणि विषय घेऊन येत यात शंकाच नाही. (Video)

अमृता ही अभिनेत्री तर आहेच, परंतु ती एक प्रशिक्षित गायिका आणि लेखिकासुद्धा आहे. ती मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील नाटकांत काम करत असते. अमृताचे 'ती फुलराणी' हे नाटक प्रचंड गाजले होते. अमृता प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com