मुंबईत महापौरपदासाठी शिंदेंची फिल्डिंग? शिंदेंना हवंय मुंबईचं महापौरपद?

Shinde Sena Mumbai Mayor Strategy Vs Bjp: मुंबईत शिंदेसेनेनं आपला महापौर करण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केलीय... मात्र शिंदेसेनेनं कसा चक्रव्यूह आखलाय... आणि भाजप हा चक्रव्यूह कसा भेदणार...
BJP leaders celebrate victory in Mumbai as the battle for the Mayor’s post intensifies with Shinde Sena.
BJP leaders celebrate victory in Mumbai as the battle for the Mayor’s post intensifies with Shinde Sena.Saam Tv
Published On

भाजपनं मुंबईत तब्बल तीन दशकांच्या ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या....मात्र भाजपला 114 हा बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही... नेमकी हीच संधी हेरुन शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी अडीच वर्षांचं महापौरपद देण्याची मागणी केल्याची सूत्रांची माहीती आहे.. त्यामुळे मुंबईत भाजप आणि शिंदेसेनेत महापौरपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगलीय..मुंबई महापालिकेतील सत्तेचं समीकरण नेमकं कसं आहे...

भाजप- 89

शिंदेसेना- 29

बहुमतासाठीचं संख्याबळ- 114

एकूण - 118

ठाकरेसेना- 65

मनसे- 06

काँग्रेस- 24

राष्ट्रवादी - 01

एकूण- 96

एमआयएम- 08

समाजवादी पक्ष- 02

खरंतर मुंबईत महापौरपदासाठी भाजपला शिंदेसेनेची गरज पडणार हे निश्चित आहे... त्यामुळे भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिंदेसेनेनं नवी चाल खेळलीय.. त्यातच शिंदेसेनेनं नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना ह़ॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे शिंदेंनी दबावतंत्र अवलंबलं असलं तरी मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय..

विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावत होते.. मात्र तेव्हाही भाजपनं शिंदेंची मागणी धुडकावून लावलेली...आता पुन्हा मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असताना शिंदेंनी महापौरपदावरुन भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखलीय..त्यामुळे विधानसभेप्रमाणेच भाजप पुन्हा एकदा शिंदेंची मागणी धुडकावून लावणार की स्थायी समितीसारखे एखादं महत्वाचं पदं देणार हे पाहणं महत्वांच असेल. हे असं असलं तरी कल्याण डोंबिवलीत सत्तेसाठी शिंदेंना भाजपची गरज लागणार आहे.. त्यामुळे शिंदेंनी मुंबईत भाजपची कोंडी केल्यास भाजप कल्याण डोंबिवलीमध्ये जशास तसं प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com