Bhau Kadam Natak Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhau Kadam Natak: भाऊ कदम पुन्हा रंगमंच गाजवणार; 'पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची' नाटकाचा लवकरच शुभारंभ

Bhau Kadam Natak: भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ या नव्या मराठी नाटकाचा २९ ऑगस्टला पुण्यात शुभारंभ होणार आहे. जाणून घ्या नाटकाची खासियत आणि कलाकार.

Shruti Vilas Kadam

Bhau Kadam Natak: आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवणारे लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम आता नव्या नाटकातून रंगभूमीवर मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहेत. ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ या नव्या नाटकात भाऊ कदम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, नातेसंबंध, प्रेम आणि लग्नाभोवती फिरणाऱ्या गमतीदार प्रसंगांची धमाल या नाटकातून पाहायला मिळणार आहे.

‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ हे नाटक स्वप्नील बारसकर यांनी लिहिले असून, संतोष पवार यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. डॉ. उमेश आजगांवकर आणि सचिन सुभाष अवस्थी यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. मैथिली वारंग, सुजाता किरण, पुनम सरोदे परब, साकार देसाई आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका नाटकात पाहायला मिळणार आहेत. साई पियुष यांनी नाटकाला संगीत दिले आहे.

नात्यांमधील गंमत, प्रेम आणि लग्न या विषयांची विनोदी अंगाने मांडणी या नाटकातून करण्यात आली आहे. भाऊ कदम यांच्या खास विनोदी शैलीमुळे नाटकातील प्रसंगांना आणखी रंगत येणार आहे. हास्यविनोदासोबतच नात्यांमधील भावनिक पैलूही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नाटकाबद्दल बोलताना भाऊ कदम यांनी सांगितले की, या नाटकाची कथा आणि संकल्पना गमतीदार असून, त्यातील प्रसंग प्रेक्षकांना हसवणारे आहेत. संपूर्ण कलाकारांची टीम उत्तम असून, प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव नेहमीच खास असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शुभारंभाच्या प्रयोगासाठी ते उत्सुक आहेत.

नवनीत प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. त्यामुळे भाऊ कदम यांच्या चाहत्यांसाठी आणि मराठी नाट्यरसिकांसाठी हा प्रयोग विशेष ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

SCROLL FOR NEXT