Ata Thambaycha Naay OTT: शहरातील सर्वात दुर्लक्षित हातांनी आपलं नशीब नव्यानं लिहिण्यासाठी लेखणी उचलली तर काय होईल? या जून महिन्यात ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जाहीर केलं आहे. आता थांबायचं नाय, या सिनेमात मुंबईतल्या स्वच्छता कामगारांना सलाम करण्यात आला असून या हृदयस्पर्शी सिनेमात शहर चालतं ठेवणाऱ्या, परंतु स्वतः पडद्याआड राहाणाऱ्या हिरोंची गोष्ट पाहायला मिळणार आहे.
नवोदित शिवराज वायचळ यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता थांबायचं नाय हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात भावना व आशेचं अनोखं दर्शन घडतं. थिएटरमधे प्रदर्शित झाल्यापासून हा सिनेमा सांस्कृतिक स्तरावर गाजत आहे. कौतुकास्पद अभिप्राय मिळवत बॉक्स ऑफिसवर विक्रम तोडणाऱ्या या सिनेमानं आयएमडीबीवर 8.8 चं जबरदस्त रेटिंग मिळवलं आहे. मोठ्या पडद्यावर मिळालेल्या या भरघोस यशानंतर याचं बहुप्रतीक्षीत डिजिटल प्रीमियर केवळ ZEE5 वर 28 जून रोजी होणार आहे.
सिनेमात बीएमसीमधल्या चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची गोष्ट पाहायला मिळते. त्यांना एका सुधारणावादी अधिकाऱ्याकडून अनपेक्षित प्रेरणा मिळते व ते परत शाळेत जायचा धाडसी निर्णय घेतात. साक्षरतेच्या दिशेनं कचरत टाकलेलं त्यांचं पाऊल समाजाकडून होणारा अन्याय, स्वतःवर नसलेला विश्वास आणि वयाचं ओझं अशा अडथळ्यांनी खडतर झालेलं आयुष्य बदलायला लागतं. त्यांना ज्ञानाच्या पलीकडेही काहीतरी गवसतं आणि ते म्हणजे सन्मान.
या कथेत तुकाराम (भरत जाधव) हा मध्यमवयीन सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य रस्ते स्वच्छ करण्यात इतरांपासून दुर्लक्षित, अदृश्य राहात काढलेलं असतं. नव्यानं रूजू झालेले अधिकारी (आशुतोष गोवारीकर) शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न जागवतात. तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांना आता, त्यांना जे जमणार नाही असं सांगितलं जात असतं, ते करून दाखवायचं असतं.
आता थांबायचं नाय हा सिनेमा फक्त शिक्षणाबद्दल नाही, तर तो स्वतःची ओळख परत मिळवण्याचा, आवाजहीनपणाचं चक्र भेदण्याचा आणि नवी सुरुवात करण्यासाठी धाडस मिळवण्याबद्दल आहे. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.