The Crew Poster Instagram
मनोरंजन बातम्या

The Crew Poster: ‘द क्रू’ चे पहिले पोस्टर रिलीज; करीना, क्रिती आणि तब्बू दिसणार हटक्या भूमिकेत

The Crew: राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘द क्रु’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडच्या दिग्गज तारका एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहे.

Chetan Bodke

The Crew Poster Out

नुकतंच राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘द क्रु’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडच्या दिग्गज तारका एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहे. करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन या तिघीही पहिल्यांदाच एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये या तिघींचाही फर्स्ट लूक पाहायला मिळत आहे. (Bollywood)

करीना, तब्बू आणि क्रितीच्या ह्या नव्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. रेड कलरच्या एअरहॉस्टेसच्या ड्रेसमध्ये या तिघीही कमालीच्या लक्षवेधी दिसत आहेत. चित्रपटाचा पोस्टर या तिघींनीही आपआपल्या इन्स्टाग्राम ऑफिशियल अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Bollywood Actress)

पोस्टर शेअर करताना करीना, तब्बू आणि क्रितीने ‘रेडी टू चेक - इन? टाइम टू फ्लाय’ असं कॅप्शन दिलेलं आहे. राजेश कृष्णन चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर आणि एकता कपूर या दोघींनी या चित्रपटाची निर्मिती केलीये. (Bollywood Film)

‘द क्रु’ हा चित्रपट २९ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. चित्रपटामध्ये करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त कपिल शर्मा आणि दिलझीत दोसांझही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा तीन महिलांवर आधारित आहे. या तिनही महिला एअरलाईन उद्योगातील संघर्ष आणि अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

Nashik News : ईडीचा माजी आयुक्ताला दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

SCROLL FOR NEXT