मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक बंबा बाक्या(Bamba Bakya) यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे. गायकाच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ४९ वर्षी बंबा बाक्या यांनी अखेरचा श्वास घेतला. बंबा बाक्या यांनी शेवटी ऐश्वर्या राय बच्चनच्या 'पोन्नियन सेलवन'(Ponniyin Selvan) चित्रपटात गाणे गायले होते. वयाच्या ८व्या वर्षापासून बंबा बाक्या यांच्या संगीत प्रवासाला सुरूवात झाली होती.
गायक बंबा बाक्या यांच्यावर बराच काळापासून उपचार चालू होते. मीडिया रिपोर्टनुसार, गुरूवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू काही वेळातच ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. बंबा बाक्या अवघ्या ४९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटातील गायक बंबा बाक्या आपल्या पहाडी आवाजाने प्रसिद्ध होते. बंबा यांनी अनेक सुपरहिट चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला होता. रजनीकांत 2.0 'पुलिनंगल', 'बिगिल' आणि 'कलामे कलामे' सारख्या गाण्यांना त्यांचा आवाज लाभला आहे. शेवटी बंबा बाक्या यांनी मणिरत्नच्या 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटासाठी गायले होते. गायकाच्या निधनानंतर 'पोन्नी नधी' या गाण्यातील त्यांच्या शेवटच्या क्षणांना आठवून चाहते भावूक होत आहेत. बंबा बाक्या भले जग सोडून गेले असेल तरी त्यांच्या गाण्यांमुळे ते नेहमी चाहत्यांच्या हृदयात राहील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.