Vijay Deverakonda : 'लायगर'च्या अपयशामुळे विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, अशा प्रकारे करणार नुकसान भरपाई

विजय आणि चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी हे नुकसान भरून काढण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
Vijay Deverakonda
Vijay DeverakondaSaam Tv
Published On

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर'(Liger) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू चालली नाही. लायगरच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे यांनी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. ओपनिंग डे ला बॉक्स ऑफिसवर 'लायगर'ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मात्र, हा आलेख हळूहळू खाली आला. १२० कोटींच्या बजेट असलेल्या या चित्रपटाने केवळ ४० कोटींचा व्यवसाय केला आहे. आता विजय आणि चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी हे नुकसान भरून काढण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

Vijay Deverakonda
Koffee with Karan: कियाराच्या आधी क्रिती सेननला 'लस्ट स्टोरीज'ची ऑफर, 'या' व्यक्तीच्या भीतीने नाकारला रोल

विजयने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 'लायगर' फ्लॉप झाल्यानंतर विजयला आता त्याच्या आगामी 'जन गण मन' या चित्रपटाची चिंता लागली आहे. आता अशा परिस्थितीत विजय आणि पुरी जगन्नाथ यांना मेकर्सचे मोठे नुकसान भरून काढायचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी पुढच्या 'जन गण मन' या चित्रपटासाठी त्यांची फी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Vijay Deverakonda
Mega Blockbuster : कपिल शर्मा लवकरच नवीन चित्रपटात, 'या' प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत करणार स्क्रीन शेअर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'जन गण मन' चित्रपटाचे बजेट निम्मे करण्यात आले आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या कथेवरही फेरविचार केला जात आहे. विजयापूर्वी पुरी जगन्नाथ यांनी महेश बाबूला हा चित्रपट ऑफर केला होता. मात्र, काही कारणास्तव त्याच्यासोबत काम होऊ शकले नाही. 'लायगर''च्या निर्मितीदरम्यान विजयला 'जन गण मन'ची कथा सांगितली होती. विजय देवराकोंडाला ही कथा खूप आवडली आणि त्याने या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. 'जन गण मन' हा चित्रपट पुढील वर्षी ३ ऑगस्ट रोजी हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com