Dev Joshi: सोनी सब टीव्हीवरील 'बालवीर' ही मालिका घराघरात फेमस आहे. या मालिकेने लहान मुलांचे चांगलेच मनोरंजन केले. या मालिकेतील सुपरहिरो सर्व लहान मुलांना बराच भावला. या मालिकेत 'बालवीर'चे पात्र अभिनेता देव जोशीने साकारले होते. त्याने या भूमिकेला चांगल्या पद्धतीने साकारले होते.
ते पात्र लहान मुलांमध्ये आजही कायम अजरामर आहे. देव लहान मुलांमध्ये चांगला प्रसिद्ध असून त्याचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत.
त्याने आतापर्यंत त्या मालिकेत बरीच कौतुकास्पद कामगिरी केली होती. पण त्याने आता खऱ्या आयुष्यात वाखणण्याजोगी कामगिरी केली आहे. बालवीर फेम आता खऱ्या आयुष्यात थेट चंद्रावर गगनभरारी घेणार आहे. त्याच्या कामगिरीने त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. जपानी अब्जाधीश युसाकू माएझावा यांनी 'डिअरमून' ही चंद्रमोहीम आखली आहे.
2023 स्पेसएक्स रॉकेटमधून ८ लोकांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. 'डिअरमून' मोहिमेवर त्यांच्यासोबत जाणार्या आठ क्रू सदस्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आले आहेत. त्यात बालवीर फेम अभिनेता देव जोशी हा चंद्रावर जाणाऱ्या 8 महत्वाच्या व्यक्तींपैकी एक असणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.
'डिअरमून' मोहिमेविषयी माहिती देत देव जोशी म्हणतो, "सध्या मला वाटत असणारी भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण भावना शब्दांचाही पलीकडच्या आहेत…#dearMoon च्या अशा विलक्षण, अविश्वसनीय, आयुष्यात एकदाच येणाऱ्या प्रकल्पाचा भाग असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आयुष्याने मला नेहमीच नवीन संधी देऊन आश्चर्यचकित केले आहे आणि मी कधीही न केलेला विचार हा संधीच्या रुपात मला मिळतोय, याचा अभिमान आहे."
तसेच तो पुढे बोलतो की, "जगाच्या कानाकोपऱ्यातील माझ्या सर्व हितचिंतक, चाहते आणि मित्रांनी मला आणि माझ्या कुटुंबाला पाठिंबा आणि आशिर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. या युनिव्हर्सल प्रोजेक्टमध्ये जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना मला याचा सार्थ अभिमान वाटत आहे. आता शेवटी मी म्हणू शकतो की मी चंद्रावर जात आहे."
त्याच्या या सोशल मीडियावरील पोस्टवर त्याचे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. त्याची ही बातमी ऐकून चाहत्यांसह बरेच सेलिब्रिटीही आनंदीत झाले आहेत. वेगवेगळ्या देशातील आणि विविध क्षेत्रातील आठ सदस्यांचा चंद्राच्या भोवती प्रवास करणाऱ्या या डिअरमून मिशनमध्ये समावेश करण्यात येणार आहे. सर्व सदस्यांच्या अनेक मुलाखती, वैद्यकीय तपासण्या आणि भेटीनंतर स्पेसएक्सच्या स्टारशिपवर चंद्राच्या या विलक्षण प्रवासात सर्वजण आता सहभागी होण्यासाठी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.