Balumamachya Navan Changbhala New Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Balumamachya Navan Changbhala: बाळूमामाच्या भूमिकेत कोण दिसणार?, 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री

Balumamachya Navan Changbhala New Promo: सुमित पुसावळेच्या जागेवर आता अभिनेता प्रकाश छोत्रे (Prakash Dhotre) मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं'चा नवा प्रोमो समोर आला आहे.

Priya More

Balumamachya Navan Changbhala Serial:

कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' (Balumamachya Navan Changbhala) सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये बाळूमामांची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळेने (Sumeet Pusavale) अचानक एक्झिट घेतली. सुमितने मालिका सोडल्यामुळे या मालिकेत आता बाळूमामांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अशामध्ये आता या मालिकेमध्ये 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याने एन्ट्री घेतली आहे. सुमित पुसावळेच्या जागेवर आता अभिनेता प्रकाश छोत्रे (Prakash Dhotre) मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं'चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये नव्या बाळूमामाची झलक पाहायला मिळत आहे.

नुकताच कलर्स मराठी वाहिनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचा नवा प्रोम शेअर केला. यामध्ये बाळूमामाची भूमिका साकारणाऱ्या नव्या अभिनेत्याचा फर्स्ट लूक दिसत आहे. या प्रोमोमध्ये दिसणारा अभिनेता प्रकाश धोत्रे आहेत. प्रकाश धोत्रे हे प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ते सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये देखील दिसले होते. या मालिकेमध्ये ते लतिकाच्या सासऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी आप्पा जहागीरदार हे पात्र साकारले होते. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

अभिनेता सुमित पुसावळेने 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका अचानक सोडली. ही मालिका सोडल्यानंतर सुमितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली होती. या पोस्टसोबत सुमीतने एक फोटो शेअर केला आहे. या फोटमध्ये बाळूमामांची कोल्हापूरी चप्पल, फेटा, काठी आणि त्यांची खाट, घोंगडी दिसत आहे. या पोस्टमध्ये सुमीतने असे लिहिले आहे की, 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं... नमस्कार, मी सुमित पुसावळे, खरं तर ही ओळख 'बाळुमामा' ह्या नावा व्यतिरिक्त लगेच नाही होत आणि त्याच कारण तर तुम्हाला माहिती आहेच. बोलण्यासारखं, लिहण्यासारख खूप काही आहे.'

सुमितने पुढे असे लिहिले की, 'आजही बाळूमामाच्या नावानं चांगभलं सिरिअलच्या सेटवरचा योगायोगाने गेलो होतो तो दिवस आठवतोय. योगायोगाने आणि पुढच्या काही दिवसांतच बाळूमामांच्या रोलसाठी बोलावणं आलं आणि माझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरु झालं. बाळूमामांच्या सेवेत रुजू झालो. सगळ्यातआधी ह्या मालिकेचे निर्माते श्री. संतोष अयाचित सर @santoshayachit यांचे मनापासून आभार. मला, सुमित पुसावळेला एक वेगळी ओळख दिली. ही ओळख आयुष्यभरासाठी राहील असं काम माझ्याकडून करून घेतलंत.'निखिल साने सर, दीपक राजध्यक्ष सर, विराज राजे सर, केदार शिंदे सर.' या पोस्टद्वारे सुमितने मालिकेच्या संपूर्ण टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले होते.

दरम्यान, 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका सोडल्यानंतर सुमित नेमक्या कोणत्या मालिकेमध्ये दिसणार?, त्याच्या हाती कोणता नवा प्रोजेक्ट असणार? हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक होते. अशामध्ये सुमित पुसावळेने स्टार प्रवाहवर १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेमध्ये एन्ट्री केली आहे. या मालिकेमध्ये तो हृषिकेशची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT