Harshali Malhotra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Harshali Malhotra : चाँद नजर आया...'बजरंगी भाईजान' फेम मुन्नीने व्हिडिओ शेअर करत दिल्या ईदच्या शुभेच्छा

Harshali Malhotra Video: सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' चित्रपट आजही सर्वांना आवडतो. चित्रपटातील बालकलकार म्हणजेच मुन्नीने सर्वांचीच मने जिंकली होती. मुन्नी म्हणजे हर्षाली मल्होत्रा. हर्षाली मल्होत्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Harshali Malhotra Wishes For Eid 2024 Share a Cute Video:

सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' चित्रपट आजही सर्वांना आवडतो. चित्रपटातील बालकलकार म्हणजेच मुन्नीने सर्वांचीच मने जिंकली होती. मुन्नी म्हणजे हर्षाली मल्होत्रा. हर्षाली मल्होत्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हर्षाली मल्होत्राने नुकताच ईदनिमित्त एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे. (Latest News)

हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच ईदनिमित्त खास व्हिडिओ शूट केला आहे. यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हर्षाली या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओत हर्षाली 'चांद नजर आया' या गाण्यावर छोटीशी झलक केली आहे. या व्हिडिओवर तिने 'चाँद नजर आया' असं कॅप्शन दिले आहे.

हर्षाली मल्होत्रा या व्हिडिओत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे, ईद तर उद्या आहे पण आम्ही आजच चंद्र पाहिला. तर आणखी एका युजरने म्हटल आहे की, जस्ट लूकिंग लाइक अ वाव, खूप सुंदर. अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहे.

हर्षाली मल्होत्रा सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात मूख्य भूमिकेत झळकली होती. ती सध्या कोणत्याही चित्रपटात दिसत नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

Maharashtra Live News Update: धुळे जिल्ह्यासह जवळच्या जिल्ह्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT