Baipan Bhaari Deva Box Office Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

Baipan Bhaari Deva Crossed 50 Crore : 'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर 50 कोटींची कमाई; तीन आठवड्यात केले रेकॉर्डब्रेक कलेक्शन

Baipan Bhaari Deva Box Office Collection : बायकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलं आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा तिसऱ्या आठवड्यातही कमाईचा आलेख उंचावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Baipan Bhari Deva Film Collection : केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. बायकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलं आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा तिसऱ्या आठवड्यातही कमाईचा आलेख उंचावला आहे.

'बाईपण भारी देवा' चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन अजून तीन आठवडेही पूर्ण झालेले नाही. १७ दिवसांतच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पन्नास कोटींचा गल्ला गाठला आहे.या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. बाईपण भारी देवाने बॉक्स ऑफिसवर तर कमाई केली आहेच परंतु प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं आहे.(Latest Entertainment News In Marathi)

'बाईपण भारी देवा' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक स्त्री या चित्रपटाला स्वतः च्या आयुष्याशी रिलेट करते. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाला स्त्रियांनी खूप गर्दी केली. चित्रपटाला अजूनही प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहे.

'बाईपण भारी देवा' चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ६.१० करोडची कमाई केली.चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स आफिसवर १३.५० कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आटवड्यात चित्रपटाने दुप्पटीने म्हणजेच २६.१९ कोटींची कमाई केली.

'सॅकनिल्क'च्या अहवालानुसार, 'बाईपण भारी देवा' चित्रपटाला अजून तीन आठवडेही पूर्ण झाले नाही. तरी चित्रपटाने ५० कोटींची कमाई केली आहे. रविवारी १६ जुलैला एकाच दिवशी चित्रपटाने ५ कोटींची कमाई केली. चित्रपटाने आतापर्यंत ५४.७७ कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाची कमाई पाहता चित्रपट अजूनही खूप कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच चित्रपटाच्या कमाईबद्दल माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ

Horoscope Monday Update : अचानक हाती येईल पैसा, वाचा आजचे खास राशीभविष्य

Shoe Bite Remedy: नवीन बूट घातल्यानंतर पायाला चावतात का? 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा झपाट्याने आराम

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

SCROLL FOR NEXT