बचपन का प्यार फेम सहदेवचे दिवस बदलले; जुहू बीचवर करतोय मजा, लुकही नवा Instagram /@viralboy_sahdev
मनोरंजन बातम्या

बचपन का प्यार फेम सहदेवचे दिवस बदलले; जुहू बीचवर करतोय मजा, लुकही नवा

बचपन का प्यार फेम सहदेव दिरदो याचे सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बचपन का प्यार (#BachpanKaPyar) फेम सहदेव दिरदो (sahdev dirdo) याचे सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सहदेवने बॉलिवुड गायक बादशाह (singer badshah) सोबत गाणं रेकॉर्ड केलं आणि आता तो एक सेलिब्रिटी स्टार झाला आहे. त्याचा लुकही बदलला असून त्याच्यात भरपूर आत्मविश्वास दिसतोय. त्याने इंस्टारग्रामवर (instagram post) एक व्हिडीओ टाकला आहे, ज्यात तो मुंबईतील जुहू समुद्रकिनारी (juhu beach) क्रिकेटचा आनंद घेतोय. सोबतच एका आलिशान हॉटेलमध्ये तो त्याच्या वडिलांसह थांबला आहे. (Bachpan Ka Pyar fame Sahadev Juhu has fun on the beach, the look has changed)

हे देखील पहा -

दोन दिवसांपुर्वीच म्हणजे ११ ऑगस्टला त्याने बादशाह सोबत नव्यानं गायलेलं बचपन का प्यार हे गाणं रिलीज करण्यात आलं. दोनच दिवसांत या गाण्याला यूट्यूबवर २ कोटी ९० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून लाखो लाईक्सही मिळाले आहेत आणि हा आकडा वाढतच आहे. अनेकजण या गाण्यावर शॉर्ट व्हिडीओ आणि रील्स बनवत आहे. शिवाय सहदेवचीही चांगलाच पॉप्युलर झालाय. त्यानं इंस्टाग्रामवर @viralboy_sahdev या नावाने स्वतःचं पेज सुरु केलं आहे. या इंस्टाग्राम पेजवरुन त्याने आतापर्यंत केवळ १६ पोस्ट शेयर केल्या असल्या तरी त्याचे १५ हजार फॉलोअर्स देखील लगेच झालेयत. तो बादशाहसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फॉलो करतोय.

याशिवाय २७ जुलै रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही सहदेवची भेट घेऊन त्याचं गाणं लाईव्ह ऐकुन त्याचं कौतुक केलं होत. त्याचप्रमाणे सिंगीग शो इंडीयन आयडलच्या एका एपिसोडमध्ये देखील तो आला होता ज्यात त्याने आपल्या गाण्याने धमाल केली होती. मात्र सहदेवला कार गिफ्ट मिळाल्याच्या बातम्या खोट्या आहेत. रायपुर येथे असलेल्या एमजी मोटर्सने सहदेवचा सन्मान केला आणि सहदेवच्या हाताने एका ग्राहकाला कारची चावी सोपवण्यात आली, हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र अद्यापतरी त्याला कोणतीही कार गिफ्ट मिळालेली नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT