Babbu Maan Punjabi Singer Life Threat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Babbu Maan: धक्कादायक! सिद्धू मुसेवालानंतर आणखी एका गायकाला जीवे मारण्याची धमकी

पंजाबी गायक बब्बू मानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बंबीहा टोळीने त्याला ही धमकी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Babbu Maan Punjabi Singer: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचा हृदयद्रावक मृत्यू अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्यातच आणखी एका पंजाबी गायकाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पंजाबी गायक बब्बू मानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बंबीहा टोळीने त्याला ही धमकी दिली आहे. यानंतर पंजाबी गायक बब्बू मान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

बब्बू मानला बंबीहा टोळीकडून फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. बंबीहा टोळी बब्बूला मारण्यासाठी अल्पवयीन मुलांची मदत घेऊ शकते. अल्पवयीन मुलांना हे काम करण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही सांगितले जात आहे. कोणतीही गुन्ह्याची नोंद नसलेल्या अल्पवयीन मुलांना ही टोळी तयार करत आहे. या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. (Singer)

बब्बू मानचे पूर्ण नाव ताजिंदर सिंग बब्बू मान आहे. 29 मार्च 1975 रोजी जन्मलेला बब्बू हा एक भारतीय गायक, गीतकार, संगीत दिग्दर्शक, अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. त्यांनी बहुतेक पंजाबी गाणी आणि चित्रपट केले आहेत. पंजाबी संगीत जगतातील तो एक खूप मोठा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्येही खूप काम केले आहे. (Celebrity)

29 मे 2022 ही तारीख कोणीही विसरू शकत नाही, कारण या दिवशी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीने मिळून सिद्धूची हत्या केली होती. या टोळीने गायकाला मारण्यासाठी खूप पूर्वी योजना आखली होती. सिद्धू आपल्या कारमध्ये एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips: उंचीने कमी असलेल्या मुलींनी उंच दिसण्यासाठी फॉलो करावयाच्या ७ ड्रेसिंग टीप्स

Maharashtra Live News Update: वाशिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात महिलेच्या डोक्यावर दगड घालून हत्या

KTM RC 160: धूम मचाले धूम..! ताशी ११८ किमीच्या स्पीडनं बाईक धावेल सुसाट; KTM RC 160च्या फीचससह लुक आहे खास

Marine Drive police rescue: जिवाची बाजी लावून पोलिसांनी केलं रेस्क्यू; महिलेला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर, Video सोशल मीडियावर व्हायरल

Rajya Sabha Election: राजकारण तापलं! ५ जागांसाठी महाआघाडीत बिघाडी; NDAमध्येही हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT