B-Towns glamorous lady Kareena Kapoor Karisma Kapoor Amrita Arora and Natasha Poonawala were seen having fun on the streets of London Saam Tv
मनोरंजन बातम्या

Photo : लंडन ठुमकदा...! बॉलिवूड बेबो करीना कपूरच्या 'टोळी'ची खास आउटिंग

बी-टाउनची ग्लॅमरस लेडी करीना कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि नताशा पूनावाला लंडनच्या रस्त्यावर मस्ती करताना दिसल्या. या आऊटिंगचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. करीना तिचा पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि मुले तैमूर व जेहसोबत गेल्या एक आठवड्यापासून हॉलीडे एन्जॉय करत आहेत. आता करीना कपूरसोबत करिश्मा कपूर (Karisma Kapoor), अमृता अरोरा आणि नताशा पूनावालाही लंडनला पोहोचल्या आहेत. लंडनच्या सुंदर संध्याकाळी मस्ती करताना बी-टाऊनच्या ग्लॅमरस गँगने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

करीना कपूर तिची बहीण करिश्मा कपूर बेस्ट फ्रेंड्स अमृता अरोरा आणि नताशा पूनावालासोबत लंडनच्या रस्त्यावर आपल्या हटके स्टाईलमध्ये मस्ती करताना दिसली. करीना कपूरने तिची बहीण करिश्मा कपूर आणि बेस्टी अमृता-नताशासोबतचा तिचा आउटिंगचा फोटो इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर करून, 'तुम्ही आमच्यासोबत बसू शकत नाही..पण तुम्ही आमच्यासोबत उभे राहून पोज देऊ शकता...कारण आम्हाला ते आवडते', असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

याचबरोबर अभिनेत्री करिश्मा कपूरनेही एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये, 'कॅप्शनची गरज नाही', असे लिहिले. तसेच अमृता अरोराने 'फक्त आम्ही' असे लिहून चौघींचा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुसरीकडे, नताशा पूनावालाने त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, 'आपल्या बेस्टीसोबत संध्याकाळ घालवण्यापेक्षा कोणतीही चांगली थेरपी असू शकत नाही', असे लिहिले.

लंडनच्या सुंदर संध्याकाळचा आनंद लुटण्यासाठी करीना कपूरने काळ्या रंगाचा ड्रेस आणि ब्लॅक कलरचे जॅकेट परिधान केले होते. तर करिश्मा गुलाबी-पिवळ्या फुलांच्या प्रिंटेड ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये दिसली. अमृता अरोराने व्हाइट कलरचा मिनी ड्रेस घातला होता, तर नताशा ब्ल्यू ड्रेसमध्ये दिसली. पण या चौघींचेही बेली शूज काळ्या रंगाचे होते.

करीना कपूर आणि करिश्मा कपूरशिवाय अनेक सेलिब्रिटी लंडनमध्ये हॉलीडे एन्जॉय करत आहेत. अभिनेत्री सारा अली खान आणि चित्रपट निर्माता करण जोहर यांनीही लंडन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सैफ अली खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह लंडनच्या दौऱ्यावर आहे. करीना, तैमूर, जेह यांना भेटण्यासाठी सारा आणि इब्राहिम अली देखील लंडनमध्ये गेले होते. त्याचे फोटो सारा अली खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

SCROLL FOR NEXT