Dream Girl 2 Teaser Released Saam TV
मनोरंजन बातम्या

Ayushmann Khurrana Movie : 'Dream Girl 2' टीझर आऊट; चमचमणाऱ्या साडीतली 'ही' सुंदरा आहे तरी कोण?

Dream Girl 2 Teaser : आयुष्मान खुराना पूजाच्या भूमिकेत साडी फ्लॉंट करताना दिसत आहे.

Pooja Dange

Dream Girl 2 Teaser Out : आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' ची निर्मात्यांनी घोषणा केल्यापासून चित्रपटाचे चाहते चित्रपटासाठी उत्सुक आहेत. चाहते 'ड्रीम गर्ल २' च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग 2019 मध्ये आला होता. जो सुपरहिट ठरला होता.

या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना हा कॉलर पूजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना खूपच आवडला होता. 1 ऑगस्टला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधी निर्मात्यांनी 'ड्रीम गर्ल 2' चा टीझर प्रदर्शित करण्यात आला केला आहे. यासोबतच अनन्या पांडेचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे.

ड्रीम गर्ल 2 च्या टीझरमध्ये, आयुष्मान खुराना पूजाच्या भूमिकेत साडी फ्लॉंट करताना दिसत आहे. पूजाचे किलर मूव्ह देखील आयुष्यमान फ्लॉंट करताना दिसत आहे. पण यावेळी आयुष्मान खुराना ही ड्रीम गर्ल पूजा बनून कोणता ड्रामा करणार आहे आणि कोणाची झोप उडवणार हे पाहण्यासाठी अजून प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

सध्या या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. टीझर पाहिल्यानंतर, चित्रपटासाठी अजून वाट पाहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देत आहेत. टीझरमध्ये आयुष्मान खुराना लाल रंगाची साडी नेसली आहे आणि नंतर पदर सावरत तो खांद्यावर ठेवत आहे. त्याचा चेहरा टीझरमध्ये दाखवण्यात आलेला नाही. (Latest Entertainment News)

'ड्रीम गर्ल 2' 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यावेळी आयुष्मान आणि अनन्या पांडेची जोडी चित्रपटात पाहायला मिळणार आहे, नुसरत भरुचा पहिल्या चित्रपटामध्ये आयुष्मानसोबत दिसली होती. या चित्रपटातील आयुष्मान आणि नुसरतची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. अनन्या पांडेसोबत आयुष्मानची जोडी प्रेक्षकांना आवडणार का हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला कळेल.

'ड्रीम गर्ल 2' चे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. या चित्रपटात अन्नू कपूर, परेश रावल, असरानी, ​​अभिषेक बॅनर्जी, सीमा पाहवा, विजय राज आणि राजपाल यादव आणि मनजोत सिंग दिसणार आहेत. 'ड्रीम गर्ल'मध्ये मनजोत सिंग आणि अभिषेक बॅनर्जी आयुष्मानचे मित्र बनले होते. तर अन्नू कपूर त्याच्या वडिलांच्या भूमिकेत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT