Auto Diver Who Took Saif Ali Khan  Saam tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Attack: रक्तबंबाळ, टी शर्ट माखलेला अन् इतक्यात...; सैफला मदत करणाऱ्या रिक्षाचालकानं सांगितला संपूर्ण थरार

Saif Ali Khan Attack: एका रिक्षा चालकाने सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात पोहोचवलं होतं. त्या रिक्षा चालकाशी साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी चालकाने हल्ल्यानंतर थरार सांगितलाय.

Bharat Jadhav

पॅसेनजर पाहण्यासाठी मी गल्लीने जात होतो. त्यावेळी मला एका महिलेचा रिक्षा.. रिक्षा.. असा आवाज आला. ती महिला पळत पळत आली मला थांबवलो. त्यांनी सांगितलं की, रिक्षा गेटकडे लावा एकाला मार लागलाय. त्यानंतर रक्ताने माखलेला एक व्यक्ती गेटच्या बाहेर येताना दिसला. त्या व्यक्तीच्या अंगावर पूर्ण रक्त लागलं होतं. त्याच्यासोबत अजून चार-पाच जण होते. त्यांना मी रिक्षामध्ये बसवलं.

नंतर त्यांना रुग्णालयात पोहोचवलं. हा थरार कोणत्या सिनेमामधील नाही तर सैफ अली खानच्या हल्लानंतरचा आहे. ज्या रिक्षामधून इब्राहिमने सैफला लिलावती हॉस्पिटलमध्ये नेलं, त्या रिक्षा चालकाने हा प्रसंग सांगितलाय.

सैफ अली खान हल्ला प्रकरणी वांद्रे पोलिसांकडून वेगात तपास सुरू आहे. आज सकाळी पुन्हा सैफ अली खान यांच्या घरातील सर्व नोकर आणि इतर कर्मचारी यांना चौकशीसाठी वांद्रे पोलीस घेऊन गेले. चोराच्या चाकू हल्ल्यात जखमी झाल्यानंतर सैफ अली खानला त्याचा मुलगा इब्राहिमने त्याला ऑटो रिक्षातून हॉस्पीटलमध्ये नेलं होतं. ज्या ऑटो रिक्षातून सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्या रिक्षा चालकाशी साम टीव्हीच्या प्रतिनिधीने संवाद साधलाय.

गुरुवारीमध्ये रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केला. हल्लेखोर जेहूच्या खोली घुसला. त्याने तैमुरची देखरेख करणाऱ्याने नॅनीला बंधक बनवलं होतं. तिच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी करत तिच्यावर हल्ला चढवला. त्यावेळी नॅनीने आरडाओरड केली. हा आवाज ऐकून सैफ अली खान थेट चोराला भिडला. या हाणामारीत सैफ अली खान जखमी झाला. सैफ अली खानवर चोराने ६ वार केले होते. यातील दोन वार गंभीर होते.

चाकू हल्ल्यात सैफ रक्ताने माखलेला होता. रक्तबंबाळ झालेल्या बापाला इब्राहिमने रिक्षातून लिलावती रुग्णालयात नेलं. ज्या रिक्षातून हॉस्पिटलला नेलं त्या रिक्षा चालकाने हल्ल्यानंतरचा थरार साम टीव्हीला सांगितलाय. गुरुवारी रात्री मी सीट पाहण्यासाठी गल्लीने तिकडून जात होतो. त्यावेळी एका महिलेचा रिक्षा..रिक्षा असा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तेव्हा आवाज एका बंगल्याच्या गेटमधून येत असल्याचं जाणवलं.

तेथे थोडं थांबलो नंतर पाहिलं तर एक व्यक्ती बाहेर येताना दिसला. तो व्यक्ती रक्तबंबाळ झालेला होता. त्याचा टी शर्ट पूर्ण रक्ताने माखलेला होता. त्याच्या सोबत चार ते पाच जण होते. ते रिक्षेजवळ आले त्यांना आत बसवलं आणि लिलावती रुग्णलयात पोहोचवलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्याने लगेच गार्डला बोलवून त्वरीत डॉक्टरांना बोलवायला सांगितलंय. जेव्हा स्ट्रेचरवर त्यांना ठेवण्यात आलं तेव्हा त्यांनी मी सैफ अली खान असल्याचं डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर मला मी सैफ अली खानला हॉस्पिटलला आणलं असल्याचं समजलं. त्या महिलेने मला थांबवलं आणि एका व्यक्तीला मार लागलाय. त्याला रुग्णालयात घेऊन जायचं आहे. त्यांना मी रिक्षात बसवलं आणि रुग्णालयात सोडल्याचं चालकाने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाकडून उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT