Atul Parchure Last Video :  Saam tv
मनोरंजन बातम्या

Atul Parchure Last Video : अतुल परचुरेंची राज ठाकरेंसाठी अखेरची पोस्ट; एकेक शब्दात दिसत होती तळमळ, बघा VIDEO

atul parchure on Raj Thackeray : अतुल परचुरे यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवर भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी निधन झालं. अतुल परचुरे यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. परचुरे यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतही शोककळा पसरली. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. परचुरे यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली. परचुरे यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेते अतुल परचुरे हे राज ठाकरे यांचे मित्र होते. दोघेही बालमोहन शाळेपासून त्यांची मैत्री होती. शाळेनंतरही त्यांच्यात चांगला संवाद होता. परचुरे यांच्या निधनानंतर ठाकरेंनी आयुष्यातून काही तरी निखळल्याची भावना व्यक्त केली. प्रेक्षकांच्या मनावर छाप निर्माण करणाऱ्या अतुल परचुरे यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शेवटच्या व्हिडिओमध्ये अतुल परचुरे हे त्यांचे मित्र राज ठाकरे यांच्या भूमिकेविषयी मोठ्या तळमळीने भाष्य करत आहेत. अतुल परचुरे यांचा शेवटचा व्हिडिओ मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओसोबत कॅप्शन देखील लिहिलं आहे. खोपकर यांनी लिहिलं आहे की,' राज ठाकरेंवर असलेल तुमचं निसिम्म प्रेम हे नेहमी तुमच्या बोलण्यातून आम्ही अनुभवलयं'. खोपकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये कुणी श्रद्धांजली तर कुणी भावना व्यक्त केल्या आहेत.

अतुल परचुरे काय म्हणत होते?

शेवटच्या व्हिडिओमध्ये अतुल परचुरे म्हणत होते की, 'मी अतुल परचुरे. राज ठाकरे यांचा गेल्या ४० वर्षांपासूनचा मित्र. राज यांनी कोणताही निर्णय घेतला तरी त्यांच्यावर टीका होते. त्यांच्यावर चोहीबाजूने टीका होते. आता याचं उदाहरण म्हणजे, ते आता महायुतीत सामील होणार की नाही? मला माहीत नाही की, ते सामील होणार की नाही. मला अनेक लोक सांगतात की, तुमचे मित्र राज ठाकरे आहेत. त्यांना सांगा त्यांचे निर्णय मला पटत नाही. त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. त्यांचा तो प्रॉब्लेम आहे. पन्नास प्रॉब्लेम आहेत. ते निर्णय घेताना त्याच्यातलं राजकारण त्याच्यावर मात करत आलेलं आहे. हे मी स्वानुभावाने सांगतोय. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर टीका होते.

'मला एकच सांगायचं आहे की, गेल्या १७-१८ वर्षापासून मनसेसाठी झटतोय. त्याच्यामध्ये शक्ती उभे करणे हे आपलं काम नाही का? ते आपलं कर्तव्य नाही का? संधी एकदाच द्या. पुन्हा मागणार नाही. येणाऱ्या विधानसभा, महापालिका निवडणुकीत संधी द्या. त्यानंतर टीका करायला आपण मोकळे आहोतच. जय हिंद आणि जय महाराष्ट्र, असे अतुल परचुरे पुढे म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT