Atif Aslam Angry On Fans Saam tv
मनोरंजन बातम्या

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये Atif Aslam वर उडवले पैसे, गायकाने संतप्त होत परफॉर्मस थांबला; अन् चाहत्याला स्टेजवर बोलावून...

Atif Aslam Angry On Fans: नुकताच अमेरिकेमध्ये आतिफ अस्लमचे लाईव्ह कॉन्सर्ट पार पडले. या कॉन्सर्टमध्ये घडलेल्या एका प्रकारामुळे आतिफ अस्लम चर्चेत आला आहे.

Priya More

Atif Aslam Concert:

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम (Atif Aslam) सध्या चर्चेत आला आहे. आतिफ अस्लमने आपल्या मधूर आवाजाने चाहत्यांना वेड लावलं आहे. जगभरात त्यांचे कॉन्सर्ट (Atif Aslam Concert) होत असतात. ज्यामध्ये त्याचे लाखो चाहते हजेरी लावतात. नुकताच अमेरिकेमध्ये आतिफ अस्लमचे लाईव्ह कॉन्सर्ट पार पडले. या कॉन्सर्टमध्ये घडलेल्या एका प्रकारामुळे आतिफ अस्लम चर्चेत आला आहे.

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आनंद घेण्यासाठी अनेक जण जातात. तर काही लोकं गायकासोबत गैरवर्तन करतात. ज्यामुळे इतरांचा मूड खराब होतो. आतापर्यंत आपण लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकांवर पाण्याच्या बॉटल, फोन यासारख्या गोष्टी फेकताना पाहिले आहे. त्यामुळे बऱ्याचदा वाद निर्माण झाले आहे. आता असाच काहीसा प्रकार आतिफ अस्लमसोबत घडला आहे. लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना एका व्यक्तीने गायकावर नोटा फेकल्या. त्यामुळे संतप्त होत गायकाने परफॉर्मस थांबला. त्यानंतर त्याने चाहत्याला स्टेजवर बोलावून त्याला चांगला धडा शिकवला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आतिफ अस्लम स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. गाणं गात असताना आतिफवर एक व्यक्ती पैशांचा वर्षाव करू लागते. हे पाहून आतिफ कार्यक्रम परफॉर्मस थांबवण्याचा इशारा देतो. त्यानंतर तो पैसे फेकणाऱ्या चाहत्याला स्टेजवर बोलावून त्याला पैसे उचलण्याची विनंती करतो. त्यानंतर तो त्याला सांगतो की, 'मित्रा, हे पैसे दे पण माझ्यावर टाकू नकोस. हा पैशाचा अपमान आहे. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आतिफ अस्लमचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. आतिफच्या या व्हिडीओवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'तू बरोबर आहेस'. तर दुसऱ्याने लिहिले, 'म्हणूनच मला तू खूप आवडतोस.' , पैशाचा योग्य वापर करण्याच्या कल्पनेबद्दल लोक गायकाचे कौतुक करत आहेत.

गेल्या 20 वर्षांपासून आतिफ अस्लम एक व्यावसायिक गायक म्हणून आपल्या गाण्यांनी चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. आतिफ भारताबरोबरच पाकिस्तानातही खूप लोकप्रिय आहे. आजही रसिकांना त्यांनी गायलेली गाणी ऐकायला आवडतात. 'तेरा होने लगा हूँ', 'जीना-जीना', 'आदत', 'वो लम्'हें ही त्यांची गाणी सुपरहिट ठरली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

Satara Tourism : साताऱ्याला गेल्यावर करा ट्रेकिंगचा प्लान, दिवसभर होईल धमाल-मस्ती

Jio Recharge Plan: सप्टेंबर २०२६ पर्यंत रिचार्जची चिंता मिटली! एकदाच रिचार्ज करा, संपूर्ण वर्षभर मोबाईल वापरा

SCROLL FOR NEXT