Asin Thottumakal Divorce Rumours Saam Tv
मनोरंजन बातम्या

Asin Thottumakal Divorce Rumours: असिनचा ७ वर्षांचा संसार मोडणार? अभिनेत्रीच्या सोशल मीडियावरील कृतीने चर्चांना उधाण

Asin Thottumkal Husband: असिन आणि पती राहुल शर्माच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आलंय.

Chetan Bodke

Asin Delete Pics With Husband Rahul On Instagram: आमिर खानच्या ‘गजनी’ मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री असिन थोट्टूमकल हिने प्रमुख भूमिका साकारली होती. हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांत उत्कृष्ट अभिनयाने प्रसिद्ध असलेल्या असिन थोट्टूमकल सध्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मासोबत लग्न केल्यानंतर कल्पनाने अभिनय क्षेत्र सोडलं होतं. जरी अभिनय क्षेत्र सोडलं असलं तरी असिन सोशल मीडियावर सक्रिय आहे. आता तिने पतीसोबतचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केले आहेत.

सोबतच सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या लग्नाचे देखील फोटो होते. पण आता असिन व तिचा पती राहूल यांच्यामध्ये काही आलबेल नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. याचं कारण तिने इन्स्टाग्रामवरून लग्नाचे फोटो आणि पतीबरोबरचे इतर फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. (Entertainment News)

असिन आणि राहुल शर्मा दोघांनाही एकमेकांना एकत्र डेट केल्यानंतर १९ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांनीही दिल्लीत हा विवाह सोहळा ख्रिश्चन आणि हिंदू परंपरेनुसार पार पाडला. २०१७ मध्ये असिनने मुलगी अरिनला जन्म दिला. लग्नानंतर असिनने फिल्म इंडस्ट्री सोडली होती. असिनने पती सोबतचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केल्यानंर सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे. असिनची सोशल मीडियावर शेवटची पोस्ट पाच वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या फोटोंची पोस्ट आहे. (Bollywood News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT