Ashok Saraf, Nirmiti Sawant, Bhau Kadam, Onkar To Help Irshalgad Landslide People  Saam TV
मनोरंजन बातम्या

Irshalgad Landslide Help : इर्शाळवाडीच्या मदतीसाठी रंगकर्मी धावले; अशोक सराफ, निर्मिती सावंत, भाऊ कदम, ओंकार भोजने करणार नाटकांचे खास प्रयोग

Marathi Celebrity : इर्शाळवाडीच्या मदतीला आता मराठी नाटकातील कलाकार आणि निर्माते पुढे आले आहेत.

Pooja Dange

Special Shows Of Marathi Drama To Help Irshalgad Landslide People :

महाराष्ट्रातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून संपुर्ण वाडी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. लोक झोपेत असताना अचानक जोरजोरात आवाज येऊ लागले. कोणाला काही कळण्याच्या आताच होत्याच नव्हतं झालं होतं.

या दुर्घटनेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक राजकिय नेते तसेत काही कलाकार मंडळींनी इर्शाळवाडीला भेट देऊन तेथील परिस्थिती जाऊन घेतली. तसेच दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.

इर्शाळवाडीच्या मदतीला आता मराठी नाटकातील कलाकार आणि निर्माते पुढे आले आहेत. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची मुख्य भुमिका असलेले 'व्हॅक्युम क्लिनर' तसेच भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचे 'करून गेलो गाव' या नाटकांच्या माध्यामातून इर्शाळवाडी ग्रामस्थांनी मदत केली जाणार आहे.

व्हॅक्युम क्लिनर नाटकाचा शनिवारी ५ ऑगस्ट रोजी ४ वाजता यशवंत नाट्यामंदिर, माटुंगा येथे प्रयोग होणार आहे. तर करून गेलो गाव या नाटकाचे १५ ऑगस्ट रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळा ११, दुपारी ४ आणि रात्री ८ वाजता असे ३ प्रयोग होणार आहेत.

या सर्व प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नातील ठराविक रक्कम इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी दिली जाणार आहे. मराठी नाट्यकर्मींच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये कारमध्ये सापडले ३५ लाख; पोलिसांकडून रक्कम जप्त

Rahul Gandhi News : राहुल गांधींची संविधानासह महाराष्ट्रात एन्ट्री; आरक्षणाबाबत दिली मोठी गॅरंटी

Sai Tamhankar: फ्लोरल रेड लेहेंगा आणि सईचा अनोखा अंदाज

IND vs SA 1st T20I: भारत- दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

Jogeshwari Vidhan Sabha : गुरु कधी कमजोर नसतो, सव्वाशेर असतो; रवींद्र वायकरांची बाळा नर यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT