Ashok Mama  saam tv
मनोरंजन बातम्या

Ashok Mama : 'बिग बॉस मराठी' सुरू होण्याआधीच अशोक मामांची एक्झिट; मालिकेचा शेवट कसा होणार? पाहा VIDEO

Ashok Mama Serial Off Air : 'अशोक मा. मा.' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. बिग बॉस मराठी सुरू होण्याआधी मालिका संपणार आहे. मालिकेत शेवटच्या भागात काय होणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

गेले एक वर्ष 'अशोक मा. मा.' मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.

'अशोक मा. मा.' मालिका शेवटच्या वळणावर आली असून शेवटचा भाग खूपच खास असणार आहे.

11 जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी 6' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी 6'ची चर्चा पाहायला मिळत आहे. 11 जानेवारीपासून रितेश भाऊंचा शो 'बिग बॉस मराठी 6' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते बिग बॉससाठी खूपच उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी 6' सुरू होण्याआधी कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका म्हणजे महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांची 'अशोक मा. मा.' होय.

'अशोक मा. मा.' मालिका शेवटच्या वळणावर आली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या मालिकेत मराठी दिग्गज अभिनेते अशोक सराफ मुख्य भूमिकेत होते. मालिकेत त्यांचा घरासाठीचा, कुटुंबासाठीचा संघर्ष, प्रेम, जिव्हाळा, पाहायला मिळाला. 'अशोक मा.मा.' मालिकेत अलिकडेच निवेदिता सराफ यांची एन्ट्री झाली होती. त्यामुळे मालिका अधिकच रंजक झाली.

'अशोक मा. मा.' मालिकेच्या शेवटच्या भागात अशोक मामा आणि निवेदिता सराफ लग्न करणार आहे. त्यांचा गृहप्रवेश होताना दिसत आहे. दोघे एकमेकांसाठी खास उखाणा देखील घेतात. निवेदिता सराफ म्हणतात की, "सगळ्यांच्या प्रेमाखातर लग्नाला झाले राजी, अशोकरावांचं नाव घेते, ईरा आणि ईशानची निवी आजी" त्यानंतर अशोक मामा उखाणा घेत म्हणतात की, "शिस्त म्हणजे शिस्त देत होतो मी न्यारा, बॅगवाल्या निवेदितांनी शिकवला जगण्याचा मंत्र खरा." मालिकेच्या शेवटच्या भागात माजगावकरांचे सर्व कुटुंब एकत्र आणि आनंदी पाहायला मिळाले.

'अशोक मा. मा.' मालिकेच्या प्रोमोला खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "प्रेक्षकांच्या प्रेमाने घडलेली अशोक मा. मा. यांची गोष्ट आली आहे शेवटच्या वळणावर... हा खास भाग नक्की बघा!" 'अशोक मा. मा.' मालिकेचा शेवटचा भाग 10 जानेवारी रात्री 8:30 वाजता कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टार पाहता येणार आहे. 'अशोक मामा' संपत असल्यामुळे चाहते खूपच भावुक झाले आहेत. मालिकेने गेले 1 वर्ष प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT