Ashok Saraf SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf : "माझे काका...,"; फ्लाइट कॅप्टन भाचीनं विमानात केलं अशोक सराफ यांचं अभिनंदन, पाहा VIDEO

Ashok Saraf video : पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी विमानातून प्रवास केला. तेव्हा फ्लाइटची कॅप्टन त्यांची भाची होती. तिने त्यांचे एका खास पद्धतीने अभिनंदन केले आहे.

Shreya Maskar

मराठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf ) यांना नुकताच पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 27 मे रोजी हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडला. अभिनेते अशोक सराफ यांनी आजवरच्या कारकि‍र्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

सध्या सोशल मीडियावर अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायर होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ते विमानाने प्रवास करताना दिसत आहे. पुरस्कार सोहळा पार पडल्यावर मुंबईला घरी येताना अशोक सराफ यांनी विमानात प्रवास केला. तेव्हा त्यांच्यासोबत एक छान प्रसंग घडला. हा गोड क्षण तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.

अभिनेते अशोक सराफ ज्या फ्लाइटने प्रवास करत होते. त्या फ्लाइटची पायलट कॅप्टन निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे (Aditi Paranjpe) होती. तेव्हा अदिती परांजपेने फ्लाइटमध्ये खास उद्घोषणा करून अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओमध्ये अदिती म्हणते की, "नमस्कार! मी फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे. दिल्ली टू मुंबई या विमान प्रवासात तुमचे सर्वांचे स्वागत. आजचा प्रवास माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझे काका अशोक सराफ हे माझ्यासोबत या विमानातून प्रवास करणार आहेत. ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. याचा मला अभिमान वाटतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करावे. "

अदिती परांजपेने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून त्याला खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "एक अतिशय खास, भावनिक आणि आयुष्यात एकदाच येणारी फ्लाइट...अशोक काका तुमच्यासोबत प्रवास करताना मला अभिमान वाटतोय. पुन्हा एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन! "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Labour Codes: केंद्राचा मोठा निर्णय! आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

SCROLL FOR NEXT