Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील महानायक अशी अभिनेते अशोक सराफ यांची ओळख आहे.
नुकतंच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने ज्यांनी अनोखी छाप उमटवली आहे असे अशोक सराफ हे सर्वांनाच माहित आहेत.
अभिनयातले सम्राट म्हणून अशोक सराफ यांची खास ओळख आहे.
अशोक सराफ इंडस्ट्रीत सर्वांचे अशोक मामा म्हणून प्रसिद्ध आहे.
चित्रपटाच्या सेटवर अशोक सराफ यांच्याबरोबर काम करणाऱ्यांनी त्यांना सुरूवातील मामा हाक मारण्याची सुरूवात केली.
मामा हे नाव सर्वांनाच इतकं आवडलं की हळू हळू संपूर्ण चित्रपटसृष्टी अशोक मामा असे म्हणून लागली.