Punha Ekda Sade Made Teen Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Movie: कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका; 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Punha Ekda Sade Made Teen: मराठी चित्रपटसृष्टीतील ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना फार आवडला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Punha Ekda Sade Made Teen: मराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय ठरलेल्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या मनात आजही ताजा आहे. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राला भावला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आता प्रचंड शिगेला पोहोचली आहे.

नुकत्याच झळकलेल्या नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या नेहमीच्या अवखळ अंदाजात दिसत आहेत. त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधवही आहे. या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव, त्यांचा भन्नाट लूक पाहून पुन्हा एकदा हास्याचा महापूर येणार हे स्पष्ट जाणवतं. या धमाल चौकडीत रिंकू राजगुरूचाही ताजातवाना अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाले, ‘’ या वेळची जबाबदारी जास्त मोठी होती. पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र कलाकार, निर्माते, पटकथा आणि संवाद लेखक संदीप दंडवते आणि तंत्रज्ञ यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत. हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे .”

झी स्टुडिओज प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया, उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. यशराज टिळेकर आणि सौरभ लालवानी सहनिर्माते तर स्मिथ पीटर तेलगोटे सहयोगी निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ते आहेत.

अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा आणि संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर, समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले असून येत्या १४ नोव्हेंबर रोजी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT