Ashok Hande marathi Bana साम टीव्ही मराठी
मनोरंजन बातम्या

मराठमोळ्या निर्मात्याला बेदम मारहाण, मुंबईतील ऑफिसमध्ये घुसत बॅटने मारले,कलाविश्वात खळबळ

Ashok Hande Marathi Bana show : अशोक हांडे यांच्यावर मुंबईतील माटुंगा येथे त्यांच्या कार्यालयात घुसून क्रिकेट बॅटने हल्ला करण्यात आला. पार्किंग खंडणीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली.

Namdeo Kumbhar

Ashok Hande marathi Bana : 'मराठी बाणा' शोचे प्रसिद्ध मराठमोळे निर्माते अशोक किसनराव हांडे (६८) यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. हांडे यांच्यावर पार्किंग खंडणीच्या कारणावरून हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कार्यालयात लाकडी क्रिकेट बॅटने हांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. माटुंगा पश्चिममध्ये हांडे यांच्या कार्यालयातच ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात हांडे जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत एका व्यक्त केली अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रथमेश पांडुरंग अनफोडे उर्फ ​​बंटी (५३) असे आहे.

अशोक हांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. हांडे यांच्या चालकाने पोलिसांनी सांगितले की, घटना होण्यापूर्वी त्याच व्यक्तीने त्यांना पार्क करण्यावरून धमकावले आणि खंडणी मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजताच्या आसपास घडली .

अशोक हांडे यांच्या माहीम येथील मनमाला टँक रोडवरील युनायटेड हाऊस येथील 'चौरंग-मराठीबाणा' या कार्यालयात तो व्यक्ती घुसला. तोडफोड करत त्याने कार्यालयात राडा घातला होता. हांडे यांनी जाब विचारल्यानंतर बॅटने त्याने मारहाण केली. लाकडी क्रिकेट बॅटने एका व्यक्तीने हांडे यांच्यावर हल्ला केला. शिवीगाळ केली आणि कार पार्किंगवरून धमकावले, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

हप्ता दिल्याशिवाय कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही, अशी धमकी हल्लेखोराने दिली होती. हांडे यांना तो व्यक्ती शिवीगाळ करत होता. हांडे यांच्यावर बॅटनेही हल्लाही केली. कार्यलायतील एका व्यक्तीने बॅट हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याने पुन्हा बॅटने मारले. तो इतक्यावरच थांबला नाही त्याने पुन्हा इमारतीबाहेर हांडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच कार्यलायतील एका व्यक्तीने तात्काळ पोलिसांनी याबाबत माहित दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या, गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT