Ashi Hi Banwa Banwi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashi Hi Banwa Banwi: धनंजय माने इथेच राहतात का..? ३७ वर्षे पूर्ण झालेला एक एव्हरग्रीन चित्रपट

Ashi Hi Banwa Banwi: 'अशी ही बनवाबनवी' या विनोदी चित्रपटाला आज ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Shruti Vilas Kadam

Ashi Hi Banwa Banwi: मराठी चित्रपटसृष्टीत 'कल्ट क्लासिक' ठरलेला 'अशी ही बनवाबनवी' या विनोदी चित्रपटाला आज ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट केवळ त्या काळातच नाही तर आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतो. 'क्लासिक कॉमेडी' म्हटलं की मराठी रसिकांच्या मनात पहिल्यांदा या चित्रपटाचंच नाव येतं.

या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुप्रसिद्ध लेखक वसंत सबनीस यांनी लिहिली. त्यांच्या लेखणीतील विनोदाची धार, संवादातील सहजता आणि परिस्थितिजन्य विनोदाची ताकद यामुळे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच ताजा आहे. दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय आणि संगीत यांचा उत्कृष्ट संगम साधला गेल्यामुळे ‘अशी ही बनवाबनवी’ हा केवळ मनोरंजनाचा सिनेमा न राहता मराठी संस्कृतीचा एक भाग बनला.

चित्रपटातील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. अशोक सराफ यांनी साकारलेला ‘धनंजय माने’ हा व्यक्तिरेखा आजही प्रचंड लोकप्रिय आहे. इतकंच नाही तर आजही त्यांना अनेकजण या नावाने संबोधतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जबरदस्त विनोद, सचिन पिळगांवकर यांची सहज शैली, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता जोशी, अश्विनी भावे, प्रिया अरुण यांची मोहक उपस्थिती, तसेच सुधीर जोशी, विजू खोटे यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांनी या चित्रपटाला एक वेगळीच उंची दिली.

या चित्रपटातील गाणी प्रेक्षक आजही गुणगुणतात. “मनुजा जाग जरा”, “कुणीतरी येणार गं”, “हृदयी वसंत फुलताना”, आणि “अशी ही बनवाबनवी” या गाण्यांनी केवळ कथानकाला रंगतच आणली नाही तर पिढ्यानपिढ्या मराठी प्रेक्षकांच्या ओठांवर ही गाणी राहिली आहेत. या गाण्यांचा आनंद आजही लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक गाठीभेटींमध्ये अनुभवायला मिळतो.

अशी ही बनवाबनवी’च्या संवादांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. “धनंजय माने इथेच राहतात का?', 'जाऊ बाई नका बाई इतक्यात जाऊ', 'हा माझा बायको पार्वती' अशा संवादांनी प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट केलं. आज सोशल मीडियावरही या संवादांचे मीम्स, रील्स तयार होतात. हे या चित्रपटाचं आजच्या पिढीतलं टिकून राहिलेलं वेगळं आकर्षण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला काय खायचे? फक्त २ पदार्थांपासून झटपट बनवा 'हा' पराठा

Maharashtra Live News Update: ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

Shiny Hair: सुपर शाइनिंग केसांसाठी ट्राय करा हा घरगुती हेअर मास्क, दोन आठवड्यात दिसेल फरक

Fatty Liver: मधुमेह अन् लठ्ठपणामुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितले उपाय, एकदा वाचाच...

Cars Price Dropped: कारचं स्वप्न होणार पूर्ण; जीएसटीचे नवीन दर लागू झाल्यानंतर 'या' कंपनीच्या कार झाल्या स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती

SCROLL FOR NEXT