Shreya Maskar
नवरात्रीत उपवासाला हेल्दी आणि पोट भरेल असा रताळं-राजगिरा पराठा बनवा.
रताळं-राजगिरा पराठा बनवण्यासाठी राजगिरा पीठ, रताळे, जिरे, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तूप आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
रताळं-राजगिरा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये राजगिरा पीठ, उकडलेले रताळे, जिरं, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या घालून मिक्स करा.
यात साजूक तूप घालून घट्ट मळून घेऊन दहा मिनिटे ठेवून द्या.
आता पिठाचे गोळे करून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या.
तुपात पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
शेंगदाण्याच्या चटणीसोबत रताळं-राजगिरा पराठ्याचा आस्वाद घ्या.