ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर छोट्या कारच्या किमती कमी झाल्या आहेत.
मारुती स्विफ्ट, वॅगन आर, अल्टो, टाटा टियागो, रेनॉल्ट क्विड, एस-प्रेसो आणि ह्युंडेई आय१०, सेलेरियो यांच्या नवीन किमती काय आहेत, जाणून घ्या.
मारुती स्विफ्टच्या किमतीत १८४,६०० पर्यंत कपात करण्यात आली आहे. याची नवीन किंमत ५.७९ लाख (एक्स - शोरूम) आहे
या कारच्या किमतीत ७९,६०० पर्यंत कपात करण्यात आली आहे. वॅगन आर नवीन किंमत ४.९९ लाख रुपये (एक्स -शोरूम ) आहे.
अल्टो के१० ची किंमत १,०७,६०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. नवीन किंमत ३.७० लाख रुपये (एक्स - शोरूम) आहे
टाटा टियागोच्या किमतीत १७५,००० पर्यंत कपात करण्यात आली आहे. नवीन किंमत ४.५७ लाख रुपये इतकी आहे.
रेनॉल्ट क्विडच्या किमतीत २५५,०९५ पर्यंत कमी करण्यात आली आहे. यामुळे कारच्या किमतीत घट होऊन नवीन किंमत ४.२९ लाख रुपये इतकी आहे.