Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुख खानविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Petition Filed Against Shah Rukh Khan: समीर वानखेडे प्रकरणी शाहरुख खानला आरोपी करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

Mumbai News: बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्याविरोधात मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील निलेश ओझा यांनी ही याचिका दाखल केली आहे. समीर वानखेडे प्रकरणात शाहरुख खानला आरोपी करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानविरोधात निलेश ओझा यांनी आज मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. समीर वानखेडे प्रकरणी शाहरुख खानला आरोपी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लाच प्रतिबंधक कायद्यानुसार लाच मागणारा आणि लाच देणारा दोघेही आरोपी असतात. शाहरुख खान याने लाच दिल्याने त्यालासुद्धा आरोपी करावं, अशी मागणी याचिकाकर्ता निलेश ओझा यांनी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. अशामध्ये शाहरुख खानविरोधात याचिका दाखल झाल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी समीर वानखेडेंविरोधात गुन्हेगारी कट आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये शाहरुख खानला 50 लाख रुपयांची लाच दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

या प्रकरणाची मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. समीर वानखेडे यांनी बचावासाठी शाहरुख खानसोबत केलेले कथित व्हॉट्सअॅप चॅट कोर्टासमोर सादर केले होते. या प्रकरणात कोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. याप्रकरणात समीर वानखेडे यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. हा जामीन आता 23 जूनपर्यंत वाढवण्यात आल्याने समीर वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Animal Attack : मुलासाठी आई बनली ढाल! मोकाट जनावराने मुलाला पायदळी तुडवलं, पण मातेनं वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

Cancer Risk: कारण नसताना पाठ, छाती किंवा डोकं दुखतंय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Gold Rate Today: दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोनं ₹१२०० रुपयांनी महागलं, वाचा २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

Kalyan : कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा विळखा; नो-एंट्री आदेशानंतरही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT