Aryan Khan Case: जेलमधून आई-वडिलांशी बोलताना आर्यन झाला इमोशनल Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Aryan Khan Case: जेलमधून आई-वडिलांशी बोलताना आर्यन झाला इमोशनल

हा व्हिडीओ कॉल दहा मिनिटं चालला असल्याची सुत्रांची माहिती आहे. जेलमधून आई-वडिलांशी व्हिडिओ कॉलवर बोलताना आर्यन भावुक झाल्याचे समजते.

सुरज सावंत

मुंबई: ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला स्टार किड आर्यन खान याने आपले वडील शाहरुख खान आणि आई गौरी खान यांच्याशी जेलमधून व्हिडोओ कॉलवरुन संवाद साधला. हा व्हिडीओ कॉल दहा मिनिटं चालला असल्याची सुत्रांची माहिती आहे. जेलमधून आई-वडिलांशी व्हिडिओ कॉलवर बोलताना आर्यन भावुक झाल्याचे समजते. (Aryan Khan Case: Aryan became emotional while talking to his parents from jail)

हे देखील पहा -

कोरोनाच्या नियमांमुळे सध्या कैद्यांना बाहेरील व्यक्तींशी भेटू दिलं जात नाहीय. मात्र आज सणाच्या निमित्तानं कैद्यांना व्हिडिओ कॉलवर बोलण्याची मुभा देण्यात आली. आर्यनलाही एक मोबाईल देण्यात आला ज्याद्वारे त्याने आपल्या आई-वडिलांसोबत संवाद साधला. कारागृहातील अंदाजे एकूण ३२०० कैद्यांना टप्या-टप्याने १० मिनिटांसाठी बोलण्यास दिले गेले. दहा मिनिटांच्या या व्हिडिओ कॉलमध्ये शाहरुखने आर्यनची विचारपुस केली आणि तुरुंगातील वातावरणाबद्दल विचारले. यावेळी आर्यन भावूक देखील झाला. शाहरुखने त्याला तुरुंगात जेवणासाठी ४५०० रुपयेही मनी ऑर्डरने पाठवले होते. त्याने त्या पैशातून बिस्किटं आणि पाण्याची बाटली खरेदी केली.

आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. विशेष न्यायालयाने निर्णय राखून ठेवल्यामुळे तो आता २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीतच असणार आहे. त्याला एनसीबीने ड्रग्स बाळगणे, सेवन करणे आणि विक्री करणे अशा आरोपांखाली अटक केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जनसुरक्षा विधेयकाविरोधात शिवाजी पार्कात आंदोलन

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

SCROLL FOR NEXT