Arun Govil And Dipika Chikhlia New Film
Arun Govil And Dipika Chikhlia New Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arun Govil And Dipika Chikhlia New Film: ‘रामायण’ मालिकेतील राम-सीतेची जोडी मराठी चित्रपटात एकत्र दिसणार, जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Arun Govil And Dipika Chikhlia New Film

जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली 'रामायण' ही मालिका चाहत्यांमध्ये बरीच गाजली. या मालिकेतील राम आणि सीतेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत प्रभू श्री रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरूण गोविल आणि सीता मातेच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया या दोघांनीही प्रेक्षकाचे भरपूर मनोरंजन केले. आता या मालिकेनंतर हे दोघेही लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.

पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा दाखवणारा हा चित्रपट आहे. सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे. आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास बघता यावा यासाठी आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ही चित्ररूपी चळवळ उभारली आहे. ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे. उच्च निर्मितीमूल्य, दर्जेदार तंत्रज् आणि त्याला असलेली उत्तोमोत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: दिल्लीत हरवता येत नाही म्हणू माझ्या अटकेचं कारस्थान, अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप

PM Modi Speech: काँग्रेसने देशाची ५ दशकं वाया घालवली; शिवाजी पार्कातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Maharashtra Politics 2024 : इंडिया आघाडीतील कोणाला पडतायेत पंतप्रधानपदाची स्वप्न?; एकनाथ शिंदेंनी नाव घेत शिवतीर्थावरून केली सडकून टीका

Raj Thackeray: आधी कौतुक, मग सल्ले, नंतर थेट मागणीच केली; भरसभेत PM मोदींसमोर काय म्हणाले राज ठाकरे?

RCB vs CSK सामन्यावर ऑरेंज अलर्टचं संकट! सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT