Article 370 Vs Crakk Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Article 370 Vs Crakk Collection: ‘आर्टिकल ३७०’ की ‘क्रॅक’; पहिल्या विकेंडला बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई कुणाची?

Chetan Bodke

Article 370 Vs Crakk Day 3 Box Office Collection

अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिचा ‘आर्टिकल ३७०’ चित्रपट (Article 370 Film) नुकताच २३ फेब्रुवारीला रिलीज झालेला आहे. (Bollywood) चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांची चर्चा सुरू होती. या चित्रपटासोबत विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आणि अर्जुन रामपालचा (Arjun Rampal) ॲक्शन चित्रपट ‘क्रॅक’ (Crakk Movie) ही रिलीज झाला आहे. यातील एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करीत आहे. तर दुसरा चित्रपट संथ गतीने कमाई करीत आहे. दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पहिल्या विकेंडला कशी कमाई केली आहे, जाणून घेऊया... (Bollywood)

२०१९ मध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू- काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवला होता. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे कौतुक फक्त समीक्षकांनीच नाही तर, चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणावर केले आहे. नुकतंच चित्रपट ट्रेड ॲनालिस्ट सॅकल्निकने चित्रपटाच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. चित्रपटाच्या कमाईचा आलेख चढताच दिसत आहे. यामी गौतमच्या ह्या ‘आर्टिकल ३७०’ बहुचर्चित चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर एकूण २३ कोटींची कमाई केली आहे. (Bollywood Film)

सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.९० कोटी, दुसऱ्या दिवशी ७.४० कोटी तर तिसऱ्या दिवशी ९.५० कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच जोरदार कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘आर्टिकल ३७०’ने पहिल्याच दिवशी ‘द काश्मीर फाईसल्स’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडित काढलेला आहे. यामी गौतम आणि प्रियामणी राज स्टारर ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचं प्रदर्शनापूर्वी पीएम नरेंद्र मोदींनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. (Bollywood News)

विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल स्टारर स्पोर्ट्स ॲक्शन फिल्म ‘क्रॅक’ने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली होती. मात्र चित्रपटाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. Sacknilk च्या अहवालानुसार, ‘क्रॅक’ने पहिल्या दिवशी ४.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.१५ तर तिसऱ्या दिवशी २.४० कोटींची कमाई केली आहे. पहिल्या विकेंडला चित्रपटाने एकूण ८.८० कोटींची कमाई केली आहे. (Entertainment News)

दरम्यान, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाची निर्मिती आदित्य धरने केली आहे. मोनल ठाकूरसह आदित्य धर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केला आहे. अरुण गोविल, यामी गौतम, प्रियामणी, किरण करमरकर, वैभव तत्ववादी यांच्यासह अनेक कलाकारांनी 'आर्टिकल 370' या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

तर ‘क्रॅक’बद्दल सांगायचे तर, आदित्य दत्त दिग्दर्शित चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विद्युत जामवाल, अर्जुन रामपाल, नोरा फतेही मुख्य भूमिकेत आहे. विद्युत जामवाल आणि अब्बास सय्यदने चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर आदित्य दत्त, रेहान खान, सारिम मोहिम आणि मोहिंदर प्रताब सिंह यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT