ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला सुंदर आणि आकर्षक राहायचे असल्यास तुम्ही पुढील गोष्टींचा नक्की वापर करा.
नेहमी हसा, अनोळखी लोकांची कोणाशी तक्रार करु नका चांगले श्रोते व्हा
नम्रतेने तुमचं ज्ञान इतरांजवळ शेअर करा. कोणालाही कमी लेखू नका.
स्वतःचे कौतुक करायला शिका. इतरांकडून कौतुकाची अपेक्षा ठेवणे सोडा.
वेळ पाळा तसेच लोकांचा वेळ आणि मेहनत यांची कदर करा.
अपराधी वाटून न घेता 'नाही' म्हणायला शिका. आधी स्वतःची काळजी आधी घ्या, मग इतरांची काळजी करा
कधीही अनपेक्षितपणे चांगले काम करा. प्रत्येक परिस्थितीत काहीतरी सकारात्मक शोधा.
कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करा. जेव्हा इतरांसोबत असाल तेव्हा सर्व विचार दूर ठेवा आणि त्या क्षणात रहा.
इतरांच्या यशाचा स्वीकार करा आणि त्याचा साजरा करायला शिका.
सहानुभूती ठेवा, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करा.
NEXT : दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?