Arshad Warsi On Munna Bhai 3 Instagram
मनोरंजन बातम्या

Arshad Warsi On Munna Bhai 3: ‘मुन्नाभाई ३’ बद्दल ‘सर्किट’ने दिली महत्वाची माहिती, ऐकून चाहत्यांची होऊ शकते निराशा

Arshad Warsi Hints That Munna Bhai 3: ‘मुन्नाभाई ३’ बाबत अभिनेता अर्शद वारसीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Chetan Bodke

Arshad Warsi Casts Doubt On Munna Bhai 3: ‘असूर २’ मुळे चर्चेत राहिलेल्या अर्शद वारसीची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मध्ये अर्शद वारसीने ‘सर्किट’ची भूमिका साकरली होती. सीक्वलमधील उत्कृष्ट कामामुळे अर्शदला ‘सर्किट’ म्हणूनही ओळखले जाते. तसे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘मुन्नाभाई ३’ बाबत सोशल मीडियावर वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत, मात्र आता अभिनेत्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर आजही ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील अनेक मीम्स तुफान व्हायरल होतात. संजय दत्त, अर्शद वारसी सहित अनेक सेलिब्रिटींच्या मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अर्शद वारसीने ‘मुन्नाभाई ३’ बद्दल अशी गोष्ट सांगितली आहे, ते ऐकून चाहत्यांची काहीशी निराशा झालेली आहे. मुलाखतीत त्याने ‘मुन्नाभाई ३’ कदाचित प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही, अशी माहिती दिली आहे.

मुलाखतीत अर्शद वारसी म्हणतो, “ही सर्वांत विचित्र गोष्ट आहे. आमच्याकडे दिग्दर्शक आहेत, निर्माते तयार आहेत, प्रेक्षकसुद्धा आहेत, इतकंच काय तर चित्रपटात अभिनय करण्यासाठी अभिनेतेसुद्धा तयार आहेत. मात्र तरीसुद्धा या चित्रपटाची अजून तरी कोणतीच प्रगती नाही.”

चित्रपटाला इतका जास्त वेळ का लागतोय? यावर अर्शद वारसी म्हणतो, “राजू हिराणी परफेक्शनिस्ट डायरेक्टर आहे. त्यांच्याकडे 3 स्क्रिप्ट असून तीनही चित्रपच्या कथा दमदार आहेत. जरीही कथा दमदार असल्यातरी त्यात काही त्रुटी आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांना स्क्रिप्टबद्दल स्वत:चा विश्वास बसत नाही, तोपर्यंत चित्रपटावर काम करण्यासाठी सुरुवात करणार नाही. तुम्ही जर त्यांना विचारलंत तर ते नेहमी हो असंच म्हणणार, नाही म्हणणार नाहीत. दिग्दर्शक म्हणतात, मी सध्या कथेवर काम करतोय, स्क्रिप्टमध्ये मला हे पसंत नाही, ते आवडलं नाही. स्क्रिप्ट तयार झाली की लगेच पुढचं काम करू. हा टप्पा त्यांनी पार केला, तरच चित्रपटाचं शूटिंग शक्य आहे.”

संजय दत्त आणि अर्शद मुख्य भूमिकेत असलेला ‘मुन्नाभाई’ चा पहिला भाग २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. तर त्याचा आगामी सिक्वेल ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. लवकरच या चित्रपटाचा आगमाी सिक्वेल अर्थात तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT