Rakshabandhan Special | मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) आणि तिचा सावत्र भाऊ अभिनेता अर्जुन कपूर(Arjun Kapoor) यांच्यात खूप जवळचे नाते आहे. यापूर्वी या दोन्ही स्टार्सचे नाते असे नसल्याचे बोलले जाते. अभिनेत्री जान्हवी कपूरची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर या भाऊ-बहिणीचे नाते आणखी घट्ट झाले आहे. अभिनेता अर्जुन कपूरने वडील बोनी कपूर यांना त्यांच्या वाईट काळात फक्त साथच दिली नाही तर, आपल्या दोन बहिणी जान्हवी आणि खुशी कपूरची खूप काळजी घेतली. या वाईट काळात बोनी कपूरच्या चारही मुलांमध्ये एक घट्ट नातं तयार झालं आहे.
जान्हवी कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, भाऊ अर्जुन कपूरला पहिल्यांदा राखी बांधणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता. अर्जुन जशी बहीण अंशुलाची काळजी घेतो तसेच तो जान्हवी आणि खुशीचीही काळजी घेतो. जान्हवी पुढे म्हणाली की, तिला अर्जुनसोबत असल्यावर सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटते.
जान्हवीने पुढे सांगितले की, अर्जुन कपूर तिच्या आयुष्यात आल्याने ती खूश आहे. ती स्वतःला खूप भाग्यवान समजते. अर्जुन कपूरसोबत तिचे एक खास नाते आहे. एका मुलाखतीत अर्जुन कपूरने सांगितले होते की त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता,जेव्हा दोघे एकमेकांच्या समोर आले तरी त्यांच्यात बोलण्यासारखे काहीच नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे. ते एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवतात.
परंतु, जान्हवी आणि अर्जुनचे कुटुंब अद्याप एक नसल्याचेही अर्जुन कपूरने स्पष्ट केले. पण जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. फिल्मस्टार अर्जुन कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'इशकजादे' या डेब्यू चित्रपटापूर्वी त्याची आई मोना कपूरचे निधन झाले होते. त्याचबरोबर अभिनेत्री जान्हवी कपूरच्याही 'धडक' या पहिल्या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी तिची आई श्रीदेवीचे निधान झाले. अशा परिस्थितीत जान्हवीला त्यावेळेस जे दुःख सहन करावे लागले ते त्यानेही स्वतः अनुभवले होते. या एका कारणामुळे त्यांच्यामध्ये अबोला संपला आणि त्यांच्या नात्याला नव्याने सुरुवात केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.